मुंबई: नुसतं सोशल मीडिया उघडलं तरी आपल्या मित्र-मैत्रिणी किंवा नात्यातील कोणाचंतरी लग्न झाल्याचे फोटो पाहायला मिळत आहे. क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. राजस्थान रॉयल्स संघातील स्टार खेळाडूनं लगीनगाठ बांधली आहे. आपल्या गर्लफ्रेंडसोबत त्यानं लग्न केलं आहे.
राजस्थान रॉयल्स संघातील स्टार खेळाडूनं लग्न केलं. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या खेळाडूची पत्नी अभिनेत्रींएवढीच सुंदर दिसते आहे. भारताचा ऑलराऊंडर खेळाडू श्रेयस गोपालने त्याची लाँगटाइम गर्लफ्रेंड निकिता शिवसोबत लग्न केलं.
श्रेयस आणि निकिता अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर या दोघांनी एकत्र येऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्सचा ऑलराऊंडर खेळाडू श्रेयसची पत्नी निकिता नेमकी कोण आहे याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
श्रेयसने आपल्या इन्स्टाग्रामवर दोघांचा लग्नातील फोटो शेअर केला आहे. श्रेयसने 2011 मध्ये निकिताला प्रपोज केलं होतं. निकिताने मणिपाल इंस्टीट्यूट ऑफ टेकनोलॉजीमधून आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निकिताने सॉफ्टवेयर कंपनीमध्ये काम केलं. The Mana Network नावाची कंपनी तिने सुरू केली. निकीताला फिरण्याची आवड आहे. ती ज्या ज्या ठिकाणी फिरायला जाते तिथल्या सुंदर क्षणांचे फोटो आपल्या चाहत्यांसोबत ती शेअर करत असते.
निकिताला आपल्या फिटनेसवर काम करायलाही खूप आवडतं. 24 नोव्हेंबर रोजी श्रेयस आणि निकिताने विवाह केला. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. तर चाहते आणि इतर खेळाडू त्यांना नव्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देत आहेत.