...तर मला व्हीलचेअरवर आयुष्य काढावं लागलं असतं; शोएब अख्तरने शेअर केला व्हिडीओ!

आपल्या बॉलिंगने भल्या भल्या क्रिकेटरना रडवणाऱ्या स्टार बॉलर शोएब अख्तरचं चाहत्यांना आवाहन, म्हणतोय माझ्यासाठी प्रार्थना करा.

Updated: Aug 8, 2022, 09:02 PM IST
 ...तर मला व्हीलचेअरवर आयुष्य काढावं लागलं असतं; शोएब अख्तरने शेअर केला व्हिडीओ! title=

मुंबई : 'रावळपिंडी एक्सप्रेस' म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर प्रत्येकाला माहित आहे. अख्तरची त्यावेळच्या चांगल्या - चांगल्या फलंदाजांना दहशत असायची. कारण शरीरयष्टीहीनेही शोएब एकदम धिप्पाड गडी. त्यात शोएबचा रनअपही मोठा असायचा. त्यामुळे स्ट्राईकवर असलेला फलंदाजाच्या मनात भीती असायची. पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटरने एक इमोशनल व्हिडीओ शेअर केला आहे. (pakistani former cricketer shoaib akhtar share video and appeal to her fans for prayers health recovery)
 
शोएब सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तिथे त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली. शोएबने यानंतर एक व्हीडिओ शेअर केलाय. शोएब या व्हीडिओत बेडवर बसलेला दिसतोय. शोएबने या व्हीडिओतून क्रिकेट चाहत्यांना आपल्या आरोग्याबाबत प्रार्थना करा, असं आवाहन केलंय.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shoaib Akhtar (@imshoaibakhtar)

शोएबच्या व्हीडिओत काय?

"मी निवृत्त झालो तरी अजुनही दुखापतीने त्रस्त आहे. निवृत्तीनंतरच्या 4 ते 5 वर्षे मी क्रिकेट खेळू शकलो असतो. पण, जर मी खेळलो असतो, तर मला व्हीचचेअरवर बसून आयुष्य काढावं लागलं असतं. मला याची आधी कल्पना होती. त्यामुळेच मी निवृत्त झालो, असं शोएब म्हणाला.