मुंबई : पाकिस्तानचा फास्ट बॉलर शोएब अख्तरविरुद्ध खेळताना एकेकाळी दिग्गज बॅट्समनची भंभेरी उडायची. रावळपिंडी एक्सप्रेस नावानं प्रसिद्ध असलेल्या शोएबनं ४६ टेस्टमध्ये १७८ विकेट, १६३ वनडेमध्ये २४७ विकेट आणि १५ टी-२० मध्ये १९ विकेट घेतल्या. २०११ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शोएब अख्तर आता सोशल नेटवर्किंगवर बराच अॅक्टिव्ह असतो.
१९९७ साली वेस्ट इंडिज दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात करणाऱ्या शोएबनं पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा एक फोटो कोलाज शोएबनं ट्विटरवर शेअर केला. या फोटोंमध्ये शोएबच्या बॉलिंगवर दुखापत झालेले बॅट्समन दाखवण्यात आलेत.
मला क्रिकेटचा डॉन म्हणतात पण सत्य हे आहे की मला बॅट्समनना दुखापत करणं कधीच आवडलं नाही. माझं बॉलिंग करतानाचं पळणं माझ्या देशाच्या प्रेमासाठी आणि जगताल्या क्रिकेटप्रेमींसाठी असायचं, असं शोएब या ट्विटमध्ये म्हणाला.
शोएब अख्तरला या ट्विटनंतर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं. काही यूजर्सनी तर शोएब अख्तरला २००३ वर्ल्ड कपचा भारत-पाकिस्तानच्या सामन्याचा व्हिडिओ दाखवला. या मॅचमध्ये पाकिस्ताननं भारताला २७४ रनचं आव्हान दिलं होतं. ओपनिंगला आलेल्या सचिननं शोएबच्या एकाच ओव्हरमध्ये १८ रन केले. या मॅचमध्ये सचिननं ७५ बॉलमध्ये ९८ रनची खेळी केली. तर शोएबनं या मॅचमध्ये १० ओव्हरमध्ये ७२ रन दिले. भारतानं ही मॅच ६ विकेटनं जिंकली होती.
याच मॅचदरम्यान सेहवागनं शोएबवर निशाणा साधला होता. 'बाप बाप होता है और बेटा बेटा', असं सेहवाग सचिनबद्दल शोएबला म्हणाला होता. २००३च्या या वर्ल्ड कपमध्ये सचिननं शोएबला लगावलेला सिक्स कायमच क्रिकेट रसिकांच्या लक्षात राहिल.
How can you forget this gem from @sachin_rt !!
Smashing you my friend.
You were also winning asia cup this time.. pic.twitter.com/jyFgga9EXc— Gautam (@TheMystic19) October 7, 2018