श्रीलंकेविरोधात धवनचे शानदार १९० रन

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये पहिला टेस्ट गॉल इंटरनेशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बँटींगचा निर्णय घेतला. 

Updated: Jul 26, 2017, 03:22 PM IST
श्रीलंकेविरोधात धवनचे शानदार १९० रन title=

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये पहिला टेस्ट गॉल इंटरनेशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बँटींगचा निर्णय घेतला. 

टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये १ विकेट गमवत 255 रन बनवले आहेत. शिखर धवनने १९० रनची शानदार खेळी केली. पण थोडक्यात त्याचं दुहेरी शतक हुकलं. चेतेश्वर पुजारा ७२ रनवर खेळत आहे. शिखर धवनने शानदार बॅटींग करत टेस्ट करिअरमधलं पाचवं शतक ठोकलं आहे. शिखर धवनने मागील टेस्ट शतक दोन वर्षापूर्वी गॉलमध्येच झळकावलं होतं.

पाहा Live स्कोरकार्ड  

भारताला पहिला झटका 7.3 ओव्हरमध्ये २७ रनवर असतांना लागला. अभिनव मुकुंद १२ रनवर आऊट झाला. कोहली देखील ३ रनवर आऊट झाला.