मेलबर्न : गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्पिनर शेन वॉर्नचं निधन झालं. थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असताना हार्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. वयाच्या 52 व्या वर्षी वॉर्नने अखेरचा श्वास घेतला आहे. यानंतर आता त्याचं पार्थिव आज थायलंडमधून ऑस्ट्रेलियाला रवाना करण्यात आलं आहे.
थायलंड एअरपोर्टच्या ऑफिशियल्सकडून दिलेल्या माहितीनुसार, शेन वॉर्नचं पार्थिव प्रायव्हेट प्लेनने ऑस्ट्रेलियाला रवाना करण्यात आलं आहे. भारतीय वेळेनुसार, गुरुवारी सकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी वॉर्नचं पार्थिव घेऊन चार्टड प्लेन ऑस्ट्रेलियाला रवाना झालं आहे.
शेन शेन वॉर्नला 30 मार्च रोजी मेलबर्नच्या क्रिकेट मैदान सार्वजनिक स्वरूपात अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. हे मैदान वॉनच्या खेळाच्या आठवणींपैकी एक मानलं जातं. विक्टोरिया राज्याचे पंतप्रधान डेनियल एंड्रयूज यांनी बुधवारी सांगितलं की, वॉर्नचा सन्मान म्हणून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याची माहिती थायलंड पोलिसांनी दिली आहे. पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांचा अहवाल वॉर्नच्या कुटुंबीयांना आणि ऑस्ट्रेलियन दूतावासाला पाठवण्यात आला आहे, असं राष्ट्रीय पोलिस उपप्रवक्ता किसाना पठानाचारोन यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला याबद्दल त्याच्या कुटुंबीयांना कोणतीही शंका उपस्थित केलेली नाही.