मुंबई : क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध खेळाडू ज्याचं नाव मैदानावरच नाही तर सेक्स स्कँडलमध्येही गाजल. ख्रिल गेल, शेन वॉर्न सोबतच शाहिद आफ्रिदीची सेक्स स्कँडलमध्ये फसला होता. पाकिस्तानच्या या दिग्गज खेळाडूने यापूर्वी देखील लाजीरवाण्या प्रकारे गैरवर्तन केल्याचं सांगितलं जात आहे.
शाहिद आफ्रिदी हा पाकिस्तानच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी आहे. शाहिद आफ्रिदी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात वादात अडकला होता. हा वाद फार कमी लोकांना माहीत आहे. कराचीतील एका हॉटेलमध्ये शाहिद आफ्रिदी त्याच्या इतर खेळाडूंसह मुलींसोबत सापडला रूममध्ये दिसला होता.
शाहिद आफ्रिदीचे सहकारी हसन रझा आणि अतिक-उझ-जमान यांनी दावा केला होता की मुली त्याच्याकडे फक्त ऑटोग्राफसाठी आल्या होत्या. पण त्यानंतर या फॅन्सने आफ्रिदीने गैरवर्तन केल्याची तक्रार पाकिस्तान क्रिकेट बोर्डकडे केली होती.
या घटनेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या तिन्ही खेळाडूंना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2000 मध्ये खेळण्यास बंदी घातली होती. त्याने आपल्या वयाच्या 20 व्या वर्षी बहिणीसोबत लग्न केलं. मामाची मुलगी नादियासोबत निकाह केला. शाहिद आणि नादियाला 5 मुली आहेत.
शाहिद आफ्रिदी पाकिस्तानचा सर्वोत्तम ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळखला जातो. बॉलिंग आणि बॅटिंग दोन्हीमध्ये आपलं कौशल्य तो मैदानात कायम दाखवत आला आहे. त्याने काही वर्षे पाकिस्तान संघाचे नेतृत्वही केलं होतं. याशिवाय आफ्रिदीच्या नावावर त्यावेळी 36 चेंडूत शतक ठोकण्याचाही मोठा विक्रम आहे. पण हा क्रिकेटर कामगिरीमुळे कमी आणि अनेकदा त्याच्या वादांमुळे चर्चेत राहिला.