कराची : शाहिद आफ्रिदी. पाकिस्तानचा असा खेळाडू ज्याचे भारतात लाखो चाहते आहेत. सध्या तो पाकिस्तान सुपर लीग मध्ये कराची टीममधून खेळतोय. शुक्रवारी क्वेट्टा ग्लेडियेटर्ससोबत त्यांची मॅच होती. कराची ने ९ विकेटच्या बदल्यात १४९ रन्स बनविले. चांगला स्कोर होता.
क्वेटाच्या टीममध्ये शेन वॉट्सन, असद शफीक, केविन पीटरसन, आर रुसो सारखे जबरदस्त बॅट्समन्स होते. त्यामुळे मॅच रोमांचक होणारच होती.
१३ वी ओव्हर सुरू होती. शाहिद आफ्रिदी मॅचमध्ये रंग उधळत होता. ओव्हरचा तिसरा बॉल. मोहम्मद इरफानची बॉलिंग. समोर पाकिस्तानचा उमर आमीन.
त्याने टोलावलेला बॉल सीमारेषेजवळ गेला. आफ्रिदीच्या डोक्यावरून थेट सिक्स होण्याच्या मार्गावर बॉल.
पण इथेच बूम बूमने आपली कमाल दाखविली. त्याने कॅच घेऊन एका पायावर उभा राहिला. जेव्हा त्याला समजले की एका पायावर बॅलेन्स राहणार नाही.
त्याने बॉल हवेत सोडला. बाऊंड्रीच्या बाहेर गेला. लगेच मैदानाच्या आत आला आणि हवेतील बॉल अचूक झेलला.
उमर आमीन आऊट झाला. पण शाहिद आफ्रिदीचा अंदाज खूप दिवसांनी पाहायला मिळाला. त्याने आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये हात आणि पाय पसरवून आनंद व्यक्त केला.