प्रशिक्षकपदासाठी सेहवागचा बीसीसीआयकडे दोन ओळींचा अर्ज

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग निवृत्तीनंतर त्याच्या हटके ट्विट आणि कॉमेंट्रीमुळे कायमच चर्चेत असतो. 

Updated: Jun 6, 2017, 04:28 PM IST
प्रशिक्षकपदासाठी सेहवागचा बीसीसीआयकडे दोन ओळींचा अर्ज  title=

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग निवृत्तीनंतर त्याच्या हटके ट्विट आणि कॉमेंट्रीमुळे कायमच चर्चेत असतो. आता भारताचा प्रशिक्षक होण्यासाठी बीसीसीआयकडे पाठवलेल्या अर्जामुळेही सेहवाग चर्चेत आला आहे. सेहवागनं प्रशिक्षक होण्यासाठी पाठवलेला अर्ज फक्त दोन ओळींचा आहे.

आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन टीमचा मेंटर आणि प्रशिक्षक. सध्याच्या भारतीय खेळाडूंसोबत क्रिकेट खेळलो आहे. असा अर्ज सेहवागनं केला आहे. सेहवागचा हा अर्ज बघून बीसीसीआयनं त्याला आणखी सविस्तर माहिती द्यायला सांगितली आहे.

बीसीसीआयकडे आलेल्या इच्छुकांच्या अर्जानंतर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची समिती या इच्छुकांच्या मुलाखती घेतील आणि भारतीय प्रशिक्षकाची निवड करतील.