केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसऱ्या टी-२० मॅचला सुरुवात झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टी-२०मध्ये टीम इंडियाने विजय मिळला त्यानंतर दुसरी टी-२० मॅच आफ्रिकेने जिंकली. त्यामुळे दोन्ही टीम्सने १-१ ने बरोबरी केली आहे. आता तिसरी आणि शेवटची मॅच निर्णायक ठरणार आहे.
ही मॅच जिंकून सीरिज खिशात टाकण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरली आहे. या मॅचमध्ये कॅप्टन विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून टीमची जबाबदारी रोहित शर्मावर सोपवण्यात आली आहे.
अशी आहे टीम इंडिया : रोहित शर्मा, (कॅप्टन) शिखर धवन, सुरेश रैना, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, मनीष पांडे, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकुर
दक्षिण अफ्रिका : जेपी ड्युमिनी (कॅप्टन), रेजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, फरहान बेहरदीन, जूनियर डाला, क्रिस्टियन जोंकर, क्रिस मौरिस, एरॉन फांगिसो, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी आणि जूनियर डाला