'या' महिला क्रिकेटरनं घडवला इतिहास! पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

इतिहासात पहिल्यांदाज पुरुष संघाला महिला प्रशिक्षक करणार मार्गदर्शन

Updated: Mar 17, 2021, 12:10 PM IST
'या' महिला क्रिकेटरनं घडवला इतिहास! पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड title=

मुंबई: इंग्लंडची माजी क्रिकेटपटू आणि विकेटकिपर सारानं इतिहास घडवला आहे. साराचं जगभरात कौतुक केलं जात आहे. सारा टेलर आता प्रशिक्षण देताना दिसणार आहे. लवकरच प्रशिक्षकाच्या भूमिकेत असेल. साराची पुरुषांच्या क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ससेक्स कौंटी क्लबनं साराची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पुरुषांच्या क्रिकेट संघाची प्रशिक्षक होणारी सारा पहिली महिला खेळाडू ठरली आहे. इतकंच नाही तर संघातील यष्टीरक्षकांना सारा मार्गदर्शन देणार आहे. 

ही घोषणा करताना सर्वांनाच खूप आनंद झाला होता. सारा विकेटकीपरवर विशेष लक्ष देण्याकडे कल असेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. सारानं 13 वर्षांत अंतरराष्ट्रीय क्रिकेट करियरमध्ये 226 सामने खेळले आहेत. महिला क्रिकेट सामन्यांमध्ये सारा सर्वाधिक विकेटकीपिंग करणारी महिला ठरली आहे. सारानं हा अनोखा इतिहास रचला आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सारानं 7 हजारहून अधिक धावा केल्या आहेत. आता सारा टेलर एशले राइट्स, जेसन स्विफ्ट या दिग्गज प्रशिक्षकांसोबत प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. साराचं जगभरात कौतुक होत आहे. तर एवढी मोठी जबाबदारी आणि पुरुष संघाची महिला प्रशिक्षक होण्याचा मान सारानं मिळवला आहे. या संघात सारा विशेष विकेटकीपिंगचं प्रशिक्षण घेईल अशी माहिती मिळाली आहे.