Sanju Samson Gets Offer From Ireland Board : भारतीय क्रिकेट टीमचा (Cricket Team India) युवा खेळाडू संजू सॅमसनला (Sanju Samson) सध्या बराच चर्चेत आहे. नुकतंच टी-20 वर्ल्डकपनंतर झालेल्या न्यूझीलंडच्या (INDvsNZ) दौऱ्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र त्याला एकाच सामन्यात प्लेईंग 11 मध्ये जागा देण्यात आली. संजूला टीमबाहेर ठेवल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर (Social Media) बराच धुमाकूळ घातला. दरम्यान आता संजूच्या बाबतीत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
प्रत्येकाला संजूला क्रिकेटच्या मैदानावर खेळताना पाहायचं आहे. त्यामुळे क्रिकेट बोर्ड त्याला टीममध्ये न घेऊन त्याच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप बीसीसीआयवर लावण्यात आला. संजू असा प्लेअर आहे, ज्याला जगातील कोणत्याही टीममध्ये स्थान मिळू शकतं. अशातच आता एका विदेशी देशाच्या क्रिकेट बोर्डाने त्यांच्या देशाकडून खेळण्याची ऑफर मिळाली
एका रिपोर्टनुसार, संजू सॅमसनला आयरलँड क्रिकेट बोर्डाने (Ireland Cricket Board) त्यांच्या देशाकडून क्रिकेट खेळण्याचा प्रस्ताव दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयरीश बोर्डाकडून या भारतीय खेळाडूला प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्याची हमी देखील देण्यात आली होती. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, संजूने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
यावेळी संजू सॅमसनने आयरलँडचे आभार व्यक्त करून प्रस्ताव स्विकारण्यापासून मनाई केली आहे. सोबतच त्याने असंही म्हटलं आहे की, तो कोणत्याही परिस्थितीत भारताकडून खेळू इच्छितो. तो इतर कोणत्या देशाकडून खेळण्याबाबात विचारही करू शकत नाही.
भारतीय क्रिकेट टीमचं नेतृत्व करणाऱ्या संजू सॅमसनला रणजी ट्रॉफीमध्ये केरळच्या 2 सामन्यांसाठी कर्णधार बनवण्यात आलंय. मुख्य म्हणजे, संजूला कर्णधारपदाचा चांगलाच अनुभव आहे. त्याने यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सची कमान सांभाळली होती. इतकंच नाही तर त्याने आयपीएल 2022 मध्ये टीमला फायनलपर्यंतही पोहोचवलं होतं.
संजू सॅमसनने आतापर्यंत फर्स्ट क्लास करियरमध्ये एकूण 55 सामने खेळले आहे. ज्यामध्ये त्याने 37.64 च्या सरासरीने फलंदाजी करत 3162 रन्स केले आहेत. ज्यामध्ये 10 शतकं आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.