Sanath Jayasuriya Controversy: श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील स्टार खेळाडूंचा जेव्हाजेव्हा उल्लेख होतो तेव्हातेव्हा सनथ जयसूर्या याचंही नाव घेतलं जातं (Sanath Jayasuriya). जयसूर्या फलंदाजीसाठी मैदानात आल्यानंतर विरोधी संघातील खेळाडूचा होणारा गोंधळ आणि त्यांचा जयसूर्याला बाद करण्यासाठीचा संघर्ष सर्वांनीच पाहिला. अशा या क्रिकेटपटूचं खासगी आयुष्य अनेक कारणांनी चर्चेत राहिलं.
एकिकडे जयसूर्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीनं अनेकांच्याच मनाचा ठाव घेताना दिसला, तर दुसरीकडे हाच जयसूर्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसला. तिसरी पत्नी मलिका सिरिसेनागेवर सूड उगवण्यासाठी म्हणून या खेळाडूनं तिचा खासगी व्हिडीओ लीक करेपर्यंत टोकाचं पाऊल उचललं होतं असाही खळबळजनक खुलासा समोर आला होता.
ही 2017 ची गोष्ट आहे. जेव्हा जयसूर्यानं त्याची तिसरी पत्नी मलिका सिरिसेनागेचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ लीक केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार त्यानं सुडाच्याच भावनेनं हे कृत्य कतेलं होतं. या S*x टेपसंदर्भातील सर्वात पहिलं वृत्त ‘द कोलंबो टेलीग्राफ’नं प्रसिद्ध केलं होतं. माध्यमानं केलेल्या दाव्यानुसार या खेळाडूनंच पत्नीची S*x टेप लीक केली होती, ज्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
प्राथमिक माहिती आणि सूत्रांसह माध्यमांच्या दाव्यानुसार जयसूर्यानं सूडभावनेनं पत्नीचा व्हिडीओ लीक केला होता. ज्यानंतर त्याच्या Ex Wife च्या वतीनं तिच्या मित्रपरिवारातून एकानं सायबर सिक्योरिटी सेलमध्ये घडल्या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. तीन वेळा विवाहबंधनात अडकणारा जयसूर्या या बाबतीत कायमच कमनशिबी ठरला.
1998 मध्ये त्यानं ग्राउंड होस्टेस सुमुदु करुणानायकशी लग्न केलं होतं, वर्षभरात हे नातं तुटलं. 2000 मध्ये त्यानं एअर होस्टेस संद्रा डिसिल्वाशी लग्न केलं. या नात्यातून त्याला तीन मुलं झाली. 2012 मध्ये त्याचं नाव मलिकाशी जोडलं गेलं आणि त्यांच्या प्रेमाच्या नात्याची सुरुवात झाली. मलिकासाठी त्यानं दुसऱ्या पत्नीलाही घटस्फोट दिला. या दोघांनीही एका मंदिरात कोणालाही कुणकुण लागू न देता लग्न केलं होतं. जयसूर्याची तिसरी पत्नी एक अभिनेत्री असल्यामुळं श्रीलंकेत ती कायमच चर्चेत असे. पण, जयसूर्याशी लग्नानंतर काही काळातच त्याच्यासोबतचं नातं तोडून तिनं एका व्यावसायिकासोबत संसार थाटला होता. नात्यात आलेल्या या वादळानंतर जयसूर्यानं सूडभावनेनं मलिकाला धडा शिकवण्यासाठी म्हणून हे पाऊल उचलत चर्चांना वाव दिल्याचं म्हटलं जातं.