T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्डकप 2022 ला आता फक्त काहीच दिवस बाकी आहेत. येत्या 16 ऑक्टोबरपासून टी-ट्वेंटी सामना ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे. 23 ऑक्टोबररोजी भारत पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (INDvsPAK) खेळणार आहे. त्यामुळे आता टीम इंडियाची जय्यत तयारी सुरू आहे. अशातच आता टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि सिलेक्टर सबा करीम यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. (Saba Karim said that Suryakumar Yadav will help Team India win the T20 World Cup)
टीम इंडियासाठी (Team India) सध्या डेथ ओव्हर मोठी डोकेदुखी ठरली आहे. अखेरच्या ओव्हरमध्ये टीम इंडियाची गोलंदाजी रोहित शर्मासाठी डोकेदुखीचं कारण ठरली आहे. अशातच सबा करीम (Saba Karim) यांनी खडे बोल सुनावले. डेथ बॉलिंग भारतीय संघासाठी नेहमी डोकेदुखीचा विषय राहिली आहे. भारत जेव्हा एक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी दुसरी समस्या तयार होते, असं सबा म्हणाले.
टीम इंडियाच्या गोलंदाजीवर टीका करताना सबा यांनी सुर्यकुमार यादवचं कौतूक देखील केलं. मी एक गोष्ट सांगू शकतो की, टी-20 वर्ल़्ड कप (T20 World Cup) जिंकण्याची भारताची शक्यता सूर्यकुमार यादवच्या फॉर्मवर अवलंबून आहे. मी हे म्हणत आहे कारण तो अशा कठीण परिस्थितीत खेळतो. अशावेळी स्ट्राइक रेट इतका सोपा नसतो.
दरम्यान, सुर्याचा फॉर्म टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, त्याचा फॉर्म त्याच्या कौशल्यावर आणि अनुभवावर अवलंबून आहे. मोक्याच्या क्षणी सुर्या टीम इंडियासाठी ढाल बनू शकतो, असं म्हणत सबा करीमने सुर्यकुमार यादवचं कौतूक केलं आहे.