युवराजच्या रेकॉर्डची बरोबरी, एका ओव्हरमध्ये मारले ६ सिक्स

युवराज सिंगच्या एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारण्याच्या रेकॉर्डची बरोबरी करण्यात आली आहे.

Updated: Jul 24, 2017, 08:52 PM IST
युवराजच्या रेकॉर्डची बरोबरी, एका ओव्हरमध्ये मारले ६ सिक्स title=

मुंबई : युवराज सिंगच्या एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारण्याच्या रेकॉर्डची बरोबरी करण्यात आली आहे. इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या रॉस व्हिटलीनं युवराजच्या या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. नॅटवेस्ट टी20 ब्लास्टमध्ये खेळताना वोर्सेस्टरशायरच्या व्हिटलीनं यॉर्कशायरविरुद्धच्या मॅचमध्ये सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारले.

व्हिटलीच्या या रेकॉर्डनंतरही वोर्सेस्टरशायरला पराभवाचा सामना करावा लागला. डेविड विलीनं वादळी ११८ रन्स केल्यामुळे यॉर्कशायरनं २० ओव्हरमध्ये २३३/६ रन्स बनवल्या. २३४ रन्सचा पाठलाग करताना वोर्सेस्टरशायरला २० ओव्हरमध्ये १९६/७ रन्सपर्यंतच मजल मारता आली. 

टी20मध्ये असं रेकॉर्ड करणारा युवराज आणि ऍलेक्स हेल्सनंतर व्हिटली हा तिसरा खेळाडू आहे. यातल्या ऍलेक्स हेल्सनं मात्र वेगवेगळ्या ओव्हरमध्ये सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारले होते.

पाहा व्हिटलीच्या सहा बॉल सहा सिक्स

 

सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारणारे खेळाडू

- सगळ्यात पहिले हे रेकॉर्ड बनवण्याचा मान वेस्ट इंडिजचे दिग्गज ऑल राऊंडर सर गॅरी सोबर्स यांनी पटकवला. सोबर्स यांनी १९६८मध्ये नॉटिंगहमशायरकडून खेळताना ग्लॅमॉर्गनच्या माल्कम नॅशला सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारले.

- १९८५मध्ये मुंबईकडून खेळताना रवी शास्त्रीनं बडोद्याच्या के तिलकराजच्या ओव्हरमध्ये सहा सिक्स लगावले होत्या.

- २००७च्या वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सनं नेदरलॅण्ड्सच्या डेन वॅन बंगच्या एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारले होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं तेव्हाचं हे पहिलंच रेकॉर्ड होतं.

- यानंतर २००७मध्येच टी20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगनं इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या बॉलिंगवर सहा सिक्स फटकवले.

- २०१५मध्ये नॅटवेस्ट टी20 ब्लास्टमध्ये नॉटिंगहमशायरकडून खेळताना ऍलेक्स हेल्सनं वॉर्विकशायरच्या विरुद्ध लागोपाठा सहा बॉलवर सहा सिक्स लगावले होत्या. पण या सिक्स वेगवेगळ्या ओव्हरमध्ये लगावण्यात आल्या होत्या. हेल्सनं पहिले बॉयड रँकिनच्या शेवटच्या तीन बॉलवर आणि मग अतीक जावेदच्या ओव्हरमध्ये लागोपाठ तीन बॉलवर सिक्स मारले.