मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये रविंद्र जडेजा चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसत नाही. रविंद्र जडेजा गेमचेंजर ठरतो मात्र यावेळी जडेजाची बॅट आणि फिल्डिंग दोन्ही खास होत असल्याचं दिसत नाही. तो आयपीएलमध्येही अर्धवट सामने सोडून बाहेर पडला. त्याने CSK चं कर्णधारपदही सोडलं. आता नवे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत.
टी 20 वर्ल्ड कपसाठी कर्णधार रोहित शर्मा चांगले खेळाडू टीमसाठी हेरत आहेत. आता भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी एक मोठं विधान केलं आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
एका कार्यक्रमात संजय मांजरेकर म्हणाले, दिनेश कार्तिकने दाखवून दिलं की तो उत्तम फलंदाजी करू शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सामन्यात त्याने आपल्या कामगिरीनं टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
रवींद्र जडेजाही बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. अशा स्थितीत जडेजाला टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवणे कठीण होईल. संजय मांजरेकर म्हणाले की, भारत स्पेशालिस्ट फिरकीपटू म्हणून अक्षर पटेलला निवड समिती टीममध्ये स्थान देऊ शकते.
हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक आणि पंत टीममध्ये आहे. त्यामुळे आता एक चांगला बॉलरची कमतरता असताना अक्षर पटेलला संधी दिली जाऊ शकते. रवींद्र जडेजासाठी आता टीममध्ये स्थान मिळवणं खूप कठीण आहे.
नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेत दिनेश कार्तिकने चांगली कामगिरी केली. त्याने 46 च्या सरासरीने आणि 158.62 च्या स्ट्राईक रेटने 92 धावा केल्या. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जसाठी जडेजाची आयपीएल 2022 मध्ये खराब कामगिरी होती. त्याने 19.33 च्या सरासरीने केवळ 116 धावा केल्या. तर त्याने फक्त 5 विकेट्स घेतल्या.