फेडररला पराभवाचा धक्का, विम्बल्डनचं आव्हान संपुष्टात

स्वित्झर्लंडच्या अव्वल सीडेड रॉजर फेडररचं विम्बल्डनमधील आव्हान संपुष्टात आलं.

Updated: Jul 11, 2018, 10:30 PM IST
फेडररला पराभवाचा धक्का, विम्बल्डनचं आव्हान संपुष्टात title=

लंडन : स्वित्झर्लंडच्या अव्वल सीडेड रॉजर फेडररचं विम्बल्डनमधील आव्हान संपुष्टात आलं. फेडररला उपांत्यपूर्व फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या आठव्या मानांकित केविन अँडरसननं फेडररचा पाच सेटमध्ये पराभव केला. अँडरसननं आपली लढत 2-6, 6-7, 7-5, 4-6, 13-11 नं बाजी मारली. जवळपास 4 तास 14 मिनिटं चालेल्या या सामन्या फेडेक्सला अखेर पराभव सहन करावा लागला. पहिले दोन सेट फेडररनं जिंकले होते. मात्र, अखेरच्या तीन सेटमध्ये अँडरसननं जोरदार पुनरागमन केलं आणि फेडररला पराभवाची चव चाखायला लावली. या विजयासह अँडरसननं विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला.