विम्बल्डनमध्ये रॉजर विरुद्ध मारियन रंगणार सामना

रॉजर फेडरर विरुद्ध मारियन सिलीकमधील लढत टेनिस चाहत्यांसाठी सुपर संडे, सुपर मुकाबला ठरणार आहे. विक्रमी आठवं विम्बल्डन जिंकण्याच्या उद्देशानं फेडरर टेनिसकोर्टवर उतरणार आहे. तर या विम्बल्डनमध्ये सरप्राईज पॅकेज ठरलेला मारियन सिलीक फेडेक्सची घोडदौड रोखण्याचा प्रयत्न करेल.

Updated: Jul 16, 2017, 08:37 AM IST
विम्बल्डनमध्ये रॉजर विरुद्ध मारियन रंगणार सामना title=

विम्बल्डन : रॉजर फेडरर विरुद्ध मारियन सिलीकमधील लढत टेनिस चाहत्यांसाठी सुपर संडे, सुपर मुकाबला ठरणार आहे. विक्रमी आठवं विम्बल्डन जिंकण्याच्या उद्देशानं फेडरर टेनिसकोर्टवर उतरणार आहे. तर या विम्बल्डनमध्ये सरप्राईज पॅकेज ठरलेला मारियन सिलीक फेडेक्सची घोडदौड रोखण्याचा प्रयत्न करेल.

फेडररला आपल्या टेनिस करिअरमधील 19 वं ग्रँडस्लॅम जिंकण्याची नामी संधी आहे. त्याचप्रमाणे फेडररनं यावेळस विम्बल्डनच्या विजेतेपदावर आपंल नाव कोरलं. तर अशी कामगिरी करणारा तो वयस्क टेनिसपटू ठरणार आहे. सेंटर कोर्टवरची ही लढत क्रोएशियन चिलीच विरुद्ध वर्ल्ड अर्थात फेडररमध्ये असेल. आता फेडेक्स आपलं आठवं विम्बल्डन जिंकतो. की, सिलीक बाजी मारतो याकडे तमाम टेनिस चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.