ऋषभ पंतवर मुंबईत होणार मोठी सर्जरी, समोर आली मोठी माहिती!

ऋषभ पंतवर मोठी सर्जरी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.  पुढील उपचारासाठी पंतला मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं आहे. 

Updated: Jan 4, 2023, 07:09 PM IST
ऋषभ पंतवर मुंबईत होणार मोठी सर्जरी, समोर आली मोठी माहिती! title=

Rishabh Pant Health Update : भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंतचा 30 डिसेंबरला मोठा अपघात झाला होता. अपघात इतका भीषण होता की ऋषभ पंतची कार जाग्यावर जळून खाक झाली. पंतवर देहरादूनमधील मॅक्स रूग्णालयात उपचार चालू होते आता त्याला पुढील उपचारासाठी पंतला मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं आहे. ऋषभवर मोठी सर्जरी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Rishabh Pant major surgery in Mumbai big information Kokilaben Hospital latest marathi sport News)

ऋषभची लिगामेंटची सर्जरी होणार असून अपघातामध्ये त्याला दुखापत झाली आहे. पंतच्या गुडघ्याला सूज येत आहे त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात वेदना होत आहेत. सूज येत असल्यामुळे त्याच्या पायाचा एमआरआय करता आला नाही. डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांच्या देखरेखेखाली उपचार होणार आहेत. याबाबात बीसीसीआयने माहिती दिली आहे. 

ऋषभवर सर्जरी होणार असल्याने त्यातून तो पूर्णपणे कव्हर व्हायला जास्त कालावधी लागणार आहे. त्यामुळे पंत क्रिकेटपासून अनेक दिवस लांबच असणार आहे. मात्र त्याचे चाहते पंत लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत आहेत.  

ऋषभ पंत दिल्लीहून देहरादूनला आपल्या घरी निघाला होता. त्याच्या गाडीचा पहाटेच्या सुमारास अपघात झाला, गाडी इतकी स्पीडमध्ये होती की दुभाजक तोडून गाडीने चार ते पाच पलटी घेतली आणि पेट घेतला. त्यावेळी पंत एकटा गाडीत होता, नशीब बलवत्तर म्हणून तो त्या अपघाता वाचला. अपघात झाल्यानंतर पंतला झोप लागल्याचं बोललं जात होतं. मात्र ऋषभ पंतसोबत दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (DDCA director) संचालक श्याम शर्मा यांनी संवाद साधल्यावर त्याने खुलासा केला. खड्डा वाचवाचया गेला आणि अपघात झाल्याचं पंतने सांगितलं.