IPL 2022: हातातोंडाशी आलेला सामना गमावल्यानंतर संतापला ऋषभ पंत

पहिल्या पराभवानंतर कर्णधार ऋषभ पंत चांगलाच वैतागला आहे. 

Updated: Apr 3, 2022, 08:04 AM IST
IPL 2022: हातातोंडाशी आलेला सामना गमावल्यानंतर संतापला ऋषभ पंत title=

मुंबई : यंदाच्या आयपीएलमधील 10 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात गुजरात टायटन्सने 14 रन्सने पंतच्या टीमचा पराभव केला. या सिझनमधील दिल्ली कॅपिटल्सचा हा पहिला पराभव होता. पहिल्या पराभवानंतर कर्णधार ऋषभ पंत चांगलाच वैतागला आहे. यावेळी त्याने टीमच्या फलंदाजांवर पराभवाचं खापर फोडलं आहे.

सामना संपल्यानंतर ऋषभ पंत म्हणाला, "मैदानावरील पिच पाहता दिलेलं लक्ष्य पूर्ण करता येण्यासारखं होतं. विकेट पाहता स्कोर जास्त मोठा नव्हता. मधल्या काही ओव्हर्समध्ये आम्ही चांगली फलंदाजी करू शकत होतो." 

काही विकेट गमावल्यानंतर मॅचमध्ये पुन्हा कमबॅक करणं थोडं कठीण असतं. जेव्हा तुमची टीम हरते तेव्हा मनाला फार वाईट वाटतं. मात्र येणाऱ्या पुढच्या सामन्यात आम्ही चुका सुधारू, असंही ऋषभ पंतने सांगितलं आहे. 

शुभमन गिलच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) दिल्ली कॅपिट्ल्सला (Delhi Capitals) विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले आहे. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 171 धावा केल्या. गुजरातकडून गिलने सर्वाधिक 84 धावांची खेळी केली.

या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स 9 विकेट्स गमावत केवळ 157 रन्स करू शकली. यामध्ये दिल्लीकडून पंतने सर्वाधिक 43 रन्स केले. काही कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.