Babar Azam: बाबर-आफ्रिदी यांच्यात खरंच वादाची ठिणगी? पाकिस्तानच्या कोचने सांगितलं संपूर्ण सत्य

Babar Azam: अजहर महमूदने यांनी मीडियाशी बोलताना संवाद साधताना सांगितलं की, वसिम अक्रमने असं म्हटलं असेल पण मला माहित नाही. मात्र शाहीन आणि बाबर एकदम बोलत आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Jun 12, 2024, 09:22 AM IST
Babar Azam: बाबर-आफ्रिदी यांच्यात खरंच वादाची ठिणगी? पाकिस्तानच्या कोचने सांगितलं संपूर्ण सत्य title=

Babar Azam: टी-20 वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानच्या टीमवर मोठ्या प्रमाणात टीका केल्या जातात. अशातच पाकिस्तानच्या माजी खेळाडूच्या म्हणण्यानुसार, पाकचा कर्णधार बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी एकमेंकाशी वार्ता करत नाहीत. वसीम अक्रमच्या या दाव्याचं पाकिस्तानचे सहाय्यक प्रशिक्षक अझहर महमूद यांनी खंडन केलं आहे. अझहर महमूदने यांनी सांगितलं की, बाबर आणि शाहीनमध्ये रोज बोलणं होतंय.

बाबर-शाहीनबाबत काय म्हणाले अझहर महमूद?

अजहर महमूदने यांनी मीडियाशी बोलताना संवाद साधताना सांगितलं की, वसिम अक्रमने असं म्हटलं असेल पण मला माहित नाही. मात्र शाहीन आणि बाबर एकदम बोलत आहेत. पाकिस्तानची टीम कोणत्याही एका खेळाडूमुळे हरली नाही. या पराभवाला पूर्णपणे संपूर्ण टीम व्यवस्थापन जबाबदार आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने मोठा खुलासा केला होता. यावेळी बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी एकमेकांशी बोलत नसल्याचं वसीम अक्रमने म्हटलं होतं. बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीच्या मुद्द्यावर वसीम अक्रम म्हणाला की, गेल्या महिन्यात कर्णधार बदलल्यापासून ते एकमेकांशी बोलत नाहीत. मुळात ही परिस्थिती टीमसाठी अजिबात योग्य नाही. वर्ल्डकप सारख्या स्पर्धेत सर्वांनी एकजुटीने खेळले पाहिजे. हे खेळाडू 10 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहेत, मी त्यांना शिकवू शकत नाही. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहात आणि तुम्ही स्वतःसाठी खेळताय. याला काही अर्थ नाहीये, अशा खेळाडूंना घरी बसवा

मात्र पाकिस्तानचे कोच अझहर महमूद यांनी या आरोपांचं खंडन केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या माजी खेळाडू आणि टीम मॅनेजमेंट यांच्यामध्ये काही आलबेल नसल्याचं दिसून येतंय. 

भारताकडून पाकिस्तानचा पराभव

भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघ 19 ओव्हर्समध्ये 119 रन्सवर ऑलआऊट झाला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानला 120 रन्सची गरज होती. पण पाकिस्तान टीमला 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावत केवळ 113 रन्स करता आल्या. मात्र भारतीय गोलंदांजांपुढे पाकिस्तानी फलंदाज टिकू शकले नाहीत. अखेरीस टीम इंडियाचा 6 रन्सने विजय झाला.