RCB IPL 2022 Retained Players: विराटसह या 2 खेळाडूंना RCB ने केलं रिटेन

RCB संघाने कोणत्याही तरुण चेहऱ्याला रिटेन केलेले नाही.

Updated: Nov 30, 2021, 09:11 PM IST
RCB IPL 2022 Retained Players: विराटसह या 2 खेळाडूंना RCB ने केलं रिटेन title=

IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) संघानेही आयपीएल 2022 (IPL 2022) पूर्वी मोठे बदल केले आहेत. आयपीएल विजेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेला हा संघ पुढील मोसमात नव्या कर्णधारासह उतरणार आहे. मात्र, आरसीबीने विराट कोहली, (Virat Kohi) ग्लेन मॅक्सवेल (Maxwell) आणि मोहम्मद सिराज (Mohhamad siraj) यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोहलीने कर्णधारपद सोडले आहे, त्यामुळे तो केवळ स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून दिसणार आहे. 

मॅक्सवेल आणि सिराज यांना कर्णधारपद मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. अशा स्थितीत आरसीबीला मेगा लिलावादरम्यान कर्णधार खेळाडूला घ्यावे लागणार आहे. संघाने कोणत्याही तरुण चेहऱ्याला रिटेन केलेले नाही.

संघ देवदत्त पडिक्कल (Devdutt padikkal) याला रिटेन करु शकते असे म्हटले जात होते. मात्र तसं झालेलं नाही, पडिक्कल गेल्या दोन मोसमात संघाचा मुख्य भाग आहे आणि त्याने आपल्या क्षमतेने प्रभावित केले आहे. मात्र आरसीबीने त्याला लिलावात पाठवले आहे. याशिवाय युझवेंद्र चहललाही रिटेन करण्यात आलेले नाही. तो सात-आठ वर्षे संघाचा भाग होता. चहलची गणना भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये केली जाते. याशिवाय RCB ने काइल जेमिसन सारख्या खेळाडूला देखील सोडले, तर IPL 2021 च्या आधी त्याला सुमारे 14 कोटी रुपयांना संघाने विकत घेतले होते.

आरसीबीने या खेळाडूंना कायम ठेवले

विराट कोहली संघाचा मुख्य चेहरा असेल. त्याने कर्णधारपद सोडले पण आरसीबीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये त्याचे मोठे योगदान आहे.

ग्लेन मॅक्सवेल IPL 2021 मध्ये संघासाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून चांगली कामगिरी करत होता. यामुळे आरसीबीने पुन्हा त्यावर विश्वास दाखवला आहे.

मोहम्मद सिराज हा संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. गेल्या दोन मोसमात तो आघाडीचा गोलंदाज म्हणून समोर आला आहे.

आरसीबीने या खेळाडूंना सोडले

युझवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, सचिन बेबी, रजत पाटीदार, केएस भरत, काईल जेमिसन, हर्षल पटेल, नवदीप सैनी, फिन ऍलन, पवन देशपांडे, डॅन ख्रिश्चन, अॅडम झाम्पा, अक्षदीप नाथ, सुयश प्रभुदेसाई, मोहम्मद अझरुद्दीन, वॉशिंग्टन अहमद सुंदर, शाहबा सुंदर, डॅनियल सॅम्स, जॉर्ज गार्टेन, स्कॉट कुग्लिन, टिम डेव्हिड, वानिंदू हसरंगा, केन रिचर्डसन.