मुंबई : हर्षल पटेलनं आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीला गमवलं आणि त्याचं दु:ख आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलं. या भावना व्यक्त करताना हर्षल पटेलला अश्रू अनावर झाले होते.
हर्षल पटेलच्या बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर तो घरी गेला होता. बहिणीला शेवटचं पाहिलं आणि त्याच्या भावानांचा बांध फुटला. बहिणीला गमवल्यानंतर तिने सांगितलेले ते शेवटचे शब्द लक्षात ठेवून तो पुन्हा आयपीएलच्या बंगळुरू कॅम्पमध्ये सहभागी झाला.
मैदानावर परतल्यानंतर हर्षलनं सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली. तू आमच्या आयुष्यातली खूप दयाळू आणि कायम आनंद राहणारी व्यक्ती होतीस. शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या चेहऱ्यावर कायम हसू होतं. तू हसत हसत अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिलंस.
मी जेव्हा तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा तू मला म्हणाली होतीस, खेळण्याकडे लक्ष दे आणि माझी काळजी करू नकोस. ते शब्द एकमेव कारण होते मला मैदानात पुन्हा खेचून आणण्याचे. तिचे शब्द माझ्या काळात अजूनही घुमत आहेत.
चांगल्या वाईट प्रत्येक प्रसंगात मला तिची आठवण येईल असंही हर्षल पुढे म्हणाला. हर्षल आता बंगळुरू टीमकडून पुन्हा मैदानात खेळताना दिसणार आहे. त्याचं मनोबल वाढवण्यासाठी टीममधील खेळाडू त्याच्यासोबत आहेत.