नवी दिल्ली : भारतीय ऑलराऊंडर रविंद्र जडेजा आता टेस्टचा नंबर वन ऑलराऊंडर बनलाय.
जडेजाच्या अगोदर बांग्लादेशचा शाकिब अल हसन नंबर एकचा ऑलराऊंडर होता. रविंद्र जडेजाकडे आता ४३८ पॉईंटस् आहेत तर शाकिबकडे ४३१ पॉईंटस... टेस्ट रँकिंगमध्येही जडेजाकडे ८९३ पॉईंटस आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेम्स एन्डरसनकडे ८६० पॉईंस आहेत. बॉलर्सच्या रॅकिंगमध्ये जडेजा अगोदरपासूनच सर्वोच्च स्थानावर विराजमान आहे.
उल्लेखनीय म्हणजे, श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी जडेजावर एका मॅचचा बॅन लावण्यात आलाय. त्यामुळे तो तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये दिसणार नाही. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये जडेजा मॅन ऑफ द मॅच ठरला होता.
जडेजा नंबर वन टेस्ट ऑलराऊंडर ठरल्यानंतर 'आमच्या तलवारबाजीच्या मास्टरचं अभिनंदन... वेल डन जड्डू' असं म्हणत कॅप्टन विराट कोहलीनं ट्विटरवरून त्याचं अभिनंदन केलंय.
Big Congratulations to our sword master Mr Jadeja for becoming the Number 1 test all rounder with @ashwinravi99. Well done Jaddu! @imjadeja
— Virat Kohli (@imVkohli) August 8, 2017