'T20 World Cup जिंकायचा असेल तर...', Ravi Shastri यांचं मोठं वक्तव्य!

Team India जखमी असताना रवी शास्त्री म्हणतात, 'हीच मोठी संधी आता...'

Updated: Oct 10, 2022, 04:43 PM IST
'T20 World Cup जिंकायचा असेल तर...', Ravi Shastri यांचं मोठं वक्तव्य! title=

Ravi Shastri : आगामी T20 World Cup 2022 साठी आता सर्वच संघ तयारी करताना दिसत आहेत. वर्ल्ड कपसाठी आता फक्त आठवडा बाकी असताना टीम इंडियाची (Team India) तयारी अद्याप पुर्ण झाली नसल्याचं चित्र आहे. त्याला कारण ठरतंय, भारताची बॉलिंग लाईनअप... भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि स्टार ऑलराऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्माचं (Rohit Sharma) टेन्शन वाढलंय. 

बुमराह आणि जडेजाबरोबरच अर्शदीप सिंह आणि दीपक चहर देखील जखमी आहेत. त्यामुळे वर्ल्ड कपआधी (T20 World Cup) भारताचं बॉलिंग अस्त्र कमकूवत झाल्याचं चित्र आहे. अशातच आता टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मोठं वक्तव्य केलंय. हीच मोठी संधी असल्याचं रवी शास्त्री यांनी म्हटलंय.

बुमराह आणि जडेजा जखमी असल्याने टीमला मोठा धक्का असल्याना रवी शास्त्री यांनी संकटात संधी शोधली. T20 World Cup मध्ये या दोन खेळाडूंची उणीव नक्कीच भासेल, परंतू नवा चॅम्पियन शोधण्यासाठी हीच मोठी संधी असल्याचं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. बुमराहची दखमी होणं हे दुर्भाग्यपुर्ण आहे, खुप जास्त मॅचेस खेळल्यामुळे खेळाडू जखमी होण्याचं प्रमाण वाढतं, असंही रवी शास्त्री यांनी म्हटलंय.

शमीचा अनुभव कामी येईल 

2015 च्या वर्ल्ड कपला ऑस्ट्रेलिय खेळपट्टीवर धाकड फलंदाजांची दांडकी उडवणारा मोहम्मद शमी (Mohammed Shami) कोरोना पॉझिटिव्ह असल्याने वर्ल्ड कप खेळणार की नाही, याबाबत शंका होती. मात्र, काही दिवसांपूर्वी शमीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यामुळे शमी T20 World Cup खेळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यावर देखील रवी शास्त्री यांनी वक्तव्य केलं आहे.

ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर शमीला खेळण्याचा अनुभव आहे. मागील सहा वर्षात भारताने ऑस्ट्रेलियाचे अनेक दौरे केले होते आणि त्यावेळी शमीचा संघात समावेश होता, त्यामुळे त्याच्या अनुभवाचा फायदा टीम इंडियाला होऊ शकतो, असं रवी शास्त्री म्हणाले आहेत.

...तर कोणतीही टीम T20 World Cup जिंकेल

मला असं वाटतं की, टीम इंडिया खूप चांगलं प्रदर्शन करत आहे. जर टीम सेमीफायनलपर्यंत पोहोचली तर मग कोणतीही टीम वर्ल्ड कप जिंकू शकते, त्यासाठी सुरूवातीपासून चांगली सुरूवात करणं गरजेचं आहे, असंही रवी शास्त्री म्हणाले आहेत.

आणखी वाचा - Mohammed Siraj : नेमकी चूक कोणाची? अंपायरची की सिराजची? VIDEO पाहून तुम्हीच सांगा!