Rashid Khan Afghanistan T20I captain : श्रीलंका दौऱ्यामध्ये टी-20 मालिकेसाठी हार्दिक पंड्याकडे (Hardik pandya) कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. पंड्यानंतर आता त्याचा आयपीएलमधील (IPL) सहकारी खेळाडू राशिद खानचंही नशीब चमकलं आहे. अफगाणिस्तानच्या टी-20 संघाच्या कर्णधारपदी (Rashid Khan Captain) राशिदची वर्णी लागली आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान बाहेर पडल्यावर मोहम्मद नबीने (Mohammad Nabi) कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. (Rashid Khan named new Afghanistan T20I captain latest marathi sport news)
Meet Our T20I Captain@rashidkhan_19, Afghanistan’s Cricketing Wizard, has replaced @MohammadNabi007 as AfghanAtalan’s captain for the T20I format.
Read More https://t.co/fYUYXrjmxe pic.twitter.com/ZKz9IuVGtL
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 29, 2022
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज राशिद खान आता T20 विश्वचषक 2024 मध्ये अफगाणिस्तानचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. अफगाणिस्तान 3 सामन्यांच्या T20I मालिकेसाठी संयुक्त अरब अमिरातीला भेट देईल तेव्हा राशिद पदभार स्वीकारेल. ही मालिका फेब्रुवारी 2023 मध्ये खेळवली जाणार आहे.
राशिद खानने याआधीही 2019 मध्ये अफगाणिस्तानचं नेतृत्व केलं होतं. 2021 मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड कप 2022 साठी संघाची घोषणा केल्यावर राशिदसोबत चर्चा न केल्याने त्याने संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता