दिग्गज व्यक्तीला म्हटलं 'ब्रो'... ट्रोलर्स राशिद खानवर तुटून पडले!

राशिद खानचं हर्षा भोगले यांना 'ब्रो' म्हणणं फॅन्सला अजिबात रुचलं नाही

Updated: Jun 9, 2018, 04:19 PM IST
दिग्गज व्यक्तीला म्हटलं 'ब्रो'... ट्रोलर्स राशिद खानवर तुटून पडले! title=

मुंबई : स्पिन जगातील नवा बादशाह अफगानिस्तानचा राशिद खान यानं बांग्लादेशविरुद्ध तिसऱ्या आणि टी-२० मध्ये शेवटचा ओव्हर टाकला आणि बांग्लादेशवर एका रनानं आपल्या टीमला विजय मिळवून दिला. या रोमांचक फायनलमध्ये बांग्लादेशला शेवटच्या ओव्हरमध्ये ९ रन्स हवे होते... परंतु, केवळ एका रनाच्या फरकानं त्यांना पराभव स्वीकारावा लागला. अफगानिस्ताननं देहरादूनमध्ये खेळल्या गेलेल्या या सीरिजमध्ये ३-० अशा फरकानं बांग्लादेशला जोरदार मात दिली. 

या ऐतिहासिक विजयानंतर प्रसिद्ध आणि दिग्गज कमेंटेटर हर्षा भोगले यांनी ट्विटवर राशिद खान याच्या बॉलिंगची प्रशंसा केली. राशिदची खेळी शानदार असल्याचं त्यांनी ट्विटरवर म्हटलं. 

५६ वर्षीय हर्षा भोगले यांच्या या ट्विटवर उत्तर देताना १९ वर्षांच्या राशिद खाननं म्हटलं 'थॅक यू ब्रो'...

राशिद खानचं हर्षा भोगले यांना 'ब्रो' म्हणणं फॅन्सला अजिबात रुचलं नाही. त्यांनी राशिदला ट्रोल करायला सुरुवात केलीय.