आयपीएल 2019 | राजस्थानची हैदराबाद वर ७ विकेटने मात, उनाडकटची दमदार कॅच

या विजयासह राजस्थानने प्ले-ऑफमधील आपली दावेदारी कायम ठेवली आहे.

Updated: Apr 28, 2019, 05:31 PM IST
आयपीएल 2019 | राजस्थानची हैदराबाद वर ७ विकेटने मात, उनाडकटची दमदार कॅच title=

जयपूर : राजस्थान विरुद्ध हैदराबाद यांच्यात २७ एप्रिलला सामना खेळण्यात आला. या सामन्यात राजस्थानने हैदराबादचा ७ विकेटने पराभव केला. 

हैदराबादने विजयासाठी  १६१ रनचे आव्हान दिले होते. हे आव्हान राजस्थानने  ३ विकेट गमावून पूर्ण केलं. राजस्थानला पहिल्या विकेटसाठी स्टीवन स्मिथ आणि अंजिक्य रहाणे या सलामीच्या जोडीने आश्वासक सुरुवात दिली.

संजू सॅमसनने राजस्थानकडून सर्वाधिक  ४८ रन काढल्या. तर लियाम लिविंगस्टोन ४४ रन केल्या. तर अंजिक्य रहाणे आणि स्टीवन स्मिथने प्रत्येकी ३९ आणि २२ रनची उपयोगी खेळी केली. हैदराबादकडून शकीब हसन, राशिद खान आणि खलील अहमदने प्रत्यकी १ विकेट घेतली.             

दरम्यान याआधी राजस्थानने टॉस जिंकत हैदराबादला बॅटिंग करण्यास भाग पाडले. हैदराबादकडून मनिष पांडने सर्वाधिक ६१ रनची अर्धशतकी खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने ३७ रन केल्या. हैदराबादने पहिली विकेट २८ रनवर गमावली. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांनी ७५ रनची चांगली पार्टनरशीप केली. 

१०३ धावसंख्या असताना हैदराबादने डेव्हिड वॉर्नरच्या रुपात दुसरी विकेट गमावली. यानंतर कोणत्याच खेळाडूना मैदानात टिकून खेळता आले नाही. हैदराबादने पुढील ६ विकेट ४४ रनच्या मोबदल्यात गमावले. हैदराबादला निर्धारित २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून १६० केल्या. राजस्थानकडून जयदेव उनाडकट, ओशेने थॉमस, श्रेयस गोपळ आणि वरुन एरॉन या चौघांनी प्रत्येकी २ विकटे घेतले.

जयदेव उनाडकटची सुपर कॅच 

या मॅचमधील जयदेव उनाडकटने दिपक हुड्डाची पकडलेल्या कॅचची चांगलीच चर्चा पाहायला मिळाली. मॅचच्या १७ व्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर उनाडकटने दिपक हुड्डाला कॅच आऊट केले. उनाडकटने आपल्याच बॉलिगंवर त्याची कॅच घेतली. आपल्या बॉलिंगच्या रनअप दरम्यान कॅच घेणे अवघड समजले जाते. अशा प्रकारची कॅच घेण्यात अनेक बॉ़लर्सना अपयश येते. पंरतु आपल्या रनअपच्या दरम्यान उनाडकटने कॅच घेत त्याला गोल्डन डक केले. 

 

उनाडकटने घेतलेली कॅच ही साधीसुधी नव्हती. शॉर्ट बॉलवर दीपक हुड्डाने उनाडकटच्या दिशेने हवेत फटका मारला. उनाडकटने ही कॅच हवेत उडी घेत एकहाताने पकडली. इतकचं नाही तर राजस्थान कडून १६ वी ओव्हर वरुन एरॉनने टाकली. या ओव्हरच्या ५ व्या बॉलवर विजय शंकरला कॅच आऊट केले. उनाडकटने ही कॅच डीप बॅकवर्ड स्केवअर लेगवर उडी मारुन  घेतली.  

उनाडकटच्या अशा कामगिरीसाठी त्याला 'मॅन ऑफ द मॅच' तसेच 'कॅच ऑफ द मॅच' या पुरस्काराने गौरवण्यात आले.

या विजयामुळे राजस्थानचे ५ विजयासह १० पॉईंट झाले आहेत. या विजयासह राजस्थानने प्ले-ऑफमधील आपली दावेदारी कायम ठेवली आहे. परंतु राजस्थानच्या प्ले-ऑफ प्रवेशा बाबतीत जर तरची अवस्था आहे.