3 वर्षानंतर या दिग्गज खेळाडूची भारतीय टीममध्ये एन्ट्री

दिग्गज खेळाडुला 3 वर्ष पाहावी लागली वाट

Updated: Jun 16, 2018, 09:29 PM IST
3 वर्षानंतर या दिग्गज खेळाडूची भारतीय टीममध्ये एन्ट्री title=

मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन सुरेश रैना याच्यासाठी खूशखबर आहे. रैना 3 वर्षानंतर वनडे टीममध्ये येत आहे. रैनाला अंबाती रायडूच्या जागी इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलं आहे. रायडू यो-यो टेस्टमध्ये फेल झाला आहे. ज्यामुळे त्याला टीममधून बाहेर करण्यात आलं आहे. रायडूच्या जागी आता रैनाला संधी मिळाली आहे. अजिंक्य रहाणे, मनीष पांडे सोबत त्याची टक्कर होती. पण रैनाला वनडे टीममध्ये जागा मिळाली आहे.

रैना 3 वर्षानतर टीममध्ये येत आहे. रैनाने भारतासाठी शेवटची वनडे मॅच 25 ऑक्टोबर, 2015 ला दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळली होती. त्यानंतर तो वनडे टीममधून बाहेर होता. रैनाने या दरम्यान टी20 टीममध्ये वापसी केली. त्याने टी20 मध्ये चांगली कामगिरी केली. रैनाला वनडे टीममध्ये यो-यो टेस्टमध्ये फेल झाल्याने बाहेर करण्यात आलं होतं.

रैनाने कोहली, धोनीसोबत यो-यो टेस्ट पास केला आहे. टी20 मध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे देखील त्याला ही संधी मिळाली आहे.  रैनाने भारतासाठी 223 वनडे मॅचमध्ये 35.46 च्या रनरेटने 5,568 रन केले आहे. रैनाने 5 शतक आणि 36 अर्धशतक ठोकले आहेत. जर रैना वनडे सीरीजमध्ये चांगली कामगिरी करतो तर वर्ल्डकप 2019 मध्ये देखील त्याला संधी मिळू शकते.