सोशल मीडियावर Rahul Chahar आणि गर्लफ्रेंडचीच चर्चा, पाहा Unseen Photos

राहुल चाहर सोशल मीडियावर देखील खूप ऍक्टिव्ह असतो, तो अनेकदा सोशल मीडियावर एका तरुणीसोबत फोटो शेअर करत असतो.

Updated: Oct 18, 2021, 06:12 PM IST
सोशल मीडियावर  Rahul Chahar आणि गर्लफ्रेंडचीच चर्चा, पाहा Unseen Photos title=

मुंबई : टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा क्रिकेटर राहुल चाहरने त्याच्या शानदार गोलंदाजीने चाहत्यांना वेड लावतो. आयपीलमधील त्याच्या धडाकेबाज कामगिरीनंतर त्याचं नशीबच पालटलं आणि तो स्टार खेळाडूंपैकी एक झाला. क्रिकेटसोबतच राहुल प्रेमाच्या खेळपट्टीवरही खूप यशस्वी झाला आहे. सध्या राहुल चाहरचा एका तरुणीसोबत फोटो व्हायरल होत आहे. ज्याची सर्वत्र चर्चा आहे. चला तर मग ही तरुणी कोण आहे यासंदर्भात जाणून घेऊयात. (Rahul Chahar)

राहुल चाहर (Rahul Chahar) सोशल मीडियावर देखील खूप ऍक्टिव्ह असतो, तो अनेकदा सोशल मीडियावर एका तरुणीसोबत फोटो शेअर करत असतो. ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे. खरेतर राहुल सोबतची ती तरुणी त्याची गर्लफ्रेंड इशानी आहे आणि तो तिच्यासोबत फोटो शेअर करत असतो. राहुल चाहर आणि ईशानी इन्स्टाग्रामवर आपले प्रेम जाहीरपणे व्यक्त करण्यासाठी मागेपुढे पाहत नाहीत.

राहुल चाहरला बऱ्याच काळापूर्वी गर्लफ्रेंड ईशानीच्या प्रेमात बोल्ड झाला होता. ज्यानंतर त्यांने 2019मध्ये तिच्याशी साखरपुडा देखील केलं. राहुलचा चुलत भाऊ दीपक चाहरही या सोहळ्याला उपस्थित होता.

क्रिकेट चाहते आणि राहुल चाहरचे फॅन्स आता या दोघ्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु हे जोडपं 7 फेऱ्या कधी घेणार आहेत, याबद्दल त्यांनी उघड पणे काहीही सांगितले नाही.

भाऊ दिपक चाहर देखील प्रेमात

भावाची चर्चा सुरू असताना दुसरा भाऊ तरी कसा काय मागे राहिल? 7 ऑक्टोबरला दिपक चाहरने भर स्टेडियममध्ये आपल्या प्रेयसी जया भारद्वाजला लग्नासाठी प्रपोज केलं, ज्यानंतर ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. या प्रसंगानंतर आता चाहते दिपक चाहरच्या लग्ना विषयी देखीस चर्चा करत आहेत. परंतु यांनी देखील आपल्या लग्नाबद्दल अद्याप काहीही उघड केलेलं नाही. (Deepak Chahar Proposes to Girlfriend in The Stands After IPL 2021 Match)