FIFA WC 2022: फिफा फूटबॉल वर्ल्डकपसाठी कतार सज्ज, कोणत्या गटात कोणता संघ वाचा

20 नोव्हेंबरपासून फूटबॉल वर्ल्डकप स्पर्धेला कतारमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी 32 संघ सज्ज झाले असून 8 गट तयार करण्यात आले आहेत. 

Updated: Sep 27, 2022, 06:06 PM IST
FIFA WC 2022: फिफा फूटबॉल वर्ल्डकपसाठी कतार सज्ज, कोणत्या गटात कोणता संघ वाचा title=

Fifa Football World Cup 2022: जगभरात फूटबॉल या खेळाचे अनेक चाहते आहेत. अमेरिका आणि यूरोपीयन देशात फूटबॉल (Football) मोठ्या प्रमाणात खेळला जातो. असं असताना जगभरातील चाहत्यांमध्ये फूटबॉल वर्ल्डकपबाबत (Fifa World Cup) उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 20 नोव्हेंबरपासून फूटबॉल वर्ल्डकप स्पर्धेला कतारमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी 32 संघ सज्ज झाले असून 8 गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटात 4 संघ असून त्यातून दोन संघांची बाद फेरीत निवड होणार आहे. A, B,C,D,E,F,G आणि H असे आठ गट आहेत. चला जाणून घेऊयात कोणत्या गटात कोणता संघ आहे. 

गट A

  • कतार
  • इक्वॉडोर
  • सेनेगल
  • नेदरलँड

गट B

  • इंग्लंड
  • इराण
  • यूएसए
  • व्हेल्स

गट C

  • अर्जेंटिना
  • सौदी अरेबिया
  • मेक्सिको
  • पोलंड

गट D

  • फ्रांस
  • ऑस्ट्रेलिया
  • डेन्मार्क
  • टुनिसिया

गट E

  • स्पेन
  • कोस्टारिका
  • जर्मनी
  • जापान

गट F

  • बेल्जियम
  • कॅनडा
  • मोरोक्को
  • क्रोशिया

गट G

  • ब्राझील
  • सर्बिया
  • स्वित्झर्लंड
  • कॅमरून

गट H

  • पोर्तुगाल
  • घाना
  • उरुग्वे
  • दक्षिण कोरिया

साखळी फेरीत प्रत्येक संघाचे तीन सामने होतील. ज्या गटात दोन संघ अधिक गुणांसह पहिल्या दोन स्थानावर असतील त्यांना बाद फेरीत स्थान मिळेल. बाद फेरीतून आठ संघांना उपांत्यपूर्व फेरीत जातील. 14 डिसेंबर आणि 15 डिसेंबर रोजी उपांत्य फेरीचा सामना रंगेल आणि अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी असणार आहे.