Punjab Kings vs Delhi Capitals : आयपीएल 2024 चा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज (PBKS vs DC) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा 4 विकेट्सने पराभव केला आहे. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात लियाम लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) खणखणीत सिक्स मारत दिल्लीच्या विजयाचा श्रीगणेशा केला आहे. टॉस गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 174 धावा केल्या. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात आलेल्या अभिषेक पोरेलने (Abishek Porel) हर्षल पटेलच्या 20 व्या ओव्हरमध्ये 25 धावा चोपल्या. त्यामुळे दिल्लीला मोठी मजल मारण्यात यश आलं. शाय होप आणि अभिषेक पोरेल यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने पंजाबला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 175 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना पंजाबने आक्रमक फलंदाजी दाखवली. मात्र, ऋषभ पंतने कुलदीपची फिरकी चालवली अन् दिल्लीला पुन्हा सामन्यात आणलं. सॅम करन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी पंजाबला सावरलं अन् सामना अखेरच्या ओव्हरपर्यंत खेचला. एक खणखणीत सिक्स खेचत लिव्हिंगस्टोनने पंजाबला 4 विकेट्सने विजय मिळवून दिला.
अभिषेक पोरेलचा इम्पॅक्ट
अभिषेक पोरेलने या सामन्यातील आपल्या डावात 320 च्या घातक स्ट्राइक रेटने धावा केल्या. 10 चेंडूत 32 धावा करत तो नाबाद राहिला. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. अखेरच्या ओव्हरमध्ये चोपलेल्या 25 धावांच्या जोरावर दिल्लीला आघाजी मिळवता आली होती. तर पंजाबकडून सॅम करनने एकीकडे विकेट्स पडत असताना शानदार अर्धशतक ठोकलं. पंजाबकडून अर्शदीपने दोन विकेट्स घेतल्या.
ऋषभ पंतने मोडला वॉर्नरचा रेकॉर्ड
ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्सचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. त्याने दिल्ली संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. याबाबतीत ऋषभने भारताचा आणि दिल्लीचा माजी सलामीवीर विरेंदर सेहवागला मागे टाकलं. ऋषभने दिल्लीसाठी आतापर्यंत 97 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 2838 धावा केल्या आहेत. वॉर्नरने दिल्लीसाठी 82 सामने खेळले असून त्याने एकूण 2404 धावा केल्या आहेत, तर वीरेंद्र सेहवाग 2382 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, ऋषभ पंत (C), रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (C), जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, शशांक सिंग.