शाहरुख खानला खरेदी करताच, प्रीती झिंटाने व्यक्त केला आनंद, पाहा व्हिडिओ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल त्याला खरेदी करण्यासाठी इच्छूक होते.

Updated: Feb 18, 2021, 06:49 PM IST
शाहरुख खानला खरेदी करताच, प्रीती झिंटाने व्यक्त केला आनंद, पाहा व्हिडिओ title=

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ साठी गुरुवारी चेन्नईमध्ये होत असलेल्या लिलावात किंग्ज पंजाबने तमिळनाडूचा फलंदाज शाहरुख खानला 5.25 कोटींना खरेदी केले. शाहरुख खानची बेस प्राइस 20 लाख रुपये होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल त्याला खरेदी करण्यासाठी इच्छूक होते.

दिल्ली कॅपिटलने त्याच्यासाठी एक कोटी रुपयांची बोली लावली. यानंतर दिल्ली 2 कोटींवर पोचली, पण बंगळुरूने 20 लाख रुपये वाढवताच किंग्ज पंजाबनेही 2.40 कोटींची बोली लावली. यानंतर यानंतर बंगळुरूने तीन कोटी रुपयांची बोली लावली.  शाहरुखची किंमत वाढली. मग पंजाबने चार कोटी रुपयांची बोली लावली. यानंतर पंजाब किंग्जने 5.25 कोटींची मोठी बोली लावत त्याला संघात घेतलं.

पंजाब टीमची मालकीन प्रीती झिंटा यानंतर आनंद साजरा करताना दिसली.