मध्यरात्री गोंधळ घालणाऱ्या शमीच्या पत्नीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

हसीन जहांला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Updated: Apr 29, 2019, 01:31 PM IST
मध्यरात्री गोंधळ घालणाऱ्या शमीच्या पत्नीला पोलिसांनी घेतलं ताब्यात title=

नवी दिल्ली : एकीकडे देशात निवडणुकीचं वातावरण असताना दुसरीकडे क्रिकेटर मोहम्मद शमीची पत्नी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अमरोहामध्ये मध्यरात्री हाईप्रोफाइल ड्रामा पाहायला मिळाला. उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये क्रिकेटर मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शांतता भंग केल्यामुळे पोलिसांनी हसीन जहांला ताब्यात घेतल्याचं कळतं आहे. 

हसीन जहां मध्य़रात्री डिडौली येथील सहसपूर अलीनगर गावात मोहम्मद शमीच्या घरी पोहोचली. येथे हसीन जहांने मोहम्मद शमीची आई आणि कुटुंबियांसोबत वाद झाला. त्यानंतर शमीच्या आईने पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी रात्री हसीन जहांला ताब्यात घेतलं. 

हसीन जहांने आरोप केले आहेत की, मोहम्मद शमीची मोठी ओळख आणि पैशांच्या जोरावर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. रात्री १२ वाजता पोलिसांनी पतीच्या घरातून ताब्यात घेतलं आणि काही खाण्यासाठी देखील दिलं गेलं नाही.'

काही दिवसांपूर्वी हसीन जहांने शमीवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाची देशभरात चर्चा रंगली होती. शमीवर आरोप झाल्यानंतर बीसीसीआयने शमीला काही दिवसांसाठी संघातून बाहेर देखील केली होती. पण बीसीसीआयच्या अँटी करप्शनने शमीची चौकशी केल्यानंतर त्याला क्लीनचिट दिली. त्यानंतर शमी पुन्हा एकदा भारतीय संघात आला.

२४ एप्रिलला हसीन जहां अमरोहा येथे मतदान करण्यासाठी आली होती. त्यानंतर ती तेथून निघून गेली. पण काल रात्री अचानक ती शमीच्या घरी पोहोचली आणि शमीच्या कुटुंबियांसोबत तिची बाचाबाची झाली.