IPL इतिहासात पहिल्यांदाच फ्री हीटवर खेळाडू रनआऊट

आयपीएलमध्ये पहिल्यांदा अशी विकेट...

Updated: Nov 6, 2020, 09:53 PM IST
IPL इतिहासात पहिल्यांदाच फ्री हीटवर खेळाडू रनआऊट title=
(फोटो-BCCI/IPL)

अबुधाबी : आरसीबी आणि हैदराबाद दरम्यानच्या सामन्यादरम्यान आयपीएलच्या इतिहासात प्रथमच एक घटना घडली आहे. फलंदाजाचे नशीब इतके खराब की तो फ्रि हिटवर रनआऊट झालाय. तो फलंदाज होता आरसीबीचा मोईन अली. आरसीबीच्या इनिंग दरम्यान 11 व्या ओव्हरमध्ये चौथा बॉल फ्री हिट होता. एबी डिव्हिलियर्सला शाहबाज नदीपच्या नो बॉलवर मोठा शॉट खेळता आला नाही. तो फक्त एक रन घेऊ शकला. त्यानंतर मोईन अली फ्री हिटवर खेळणार होता. त्याने शॉट मारला पण तो सरळ राशिद खानच्या हातात गेला. त्याने बॉल स्टंपवर थ्रो केला आणि मोईन अली रन आऊट झाला. 

आयपीएलच्या इतिहासात, मोईन अली आपल्या खेळीच्या पहिल्याच चेंडूवर फ्री हिटवर रनआऊट होणारा पहिला फलंदाज ठरला आहे. यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. इंग्लंडचा हा खेळाडू शुन्यावर आऊट झाला.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा फलंदाजांना काही खास कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार कोहली केवळ 6 धावा करून बाद झाला. एबी डिव्हिलियर्सने अर्धशतक झळकावले. संघाला मोठी धावसंख्या उभी करता आलेली नाही. एबीने आयपीएल कारकिर्दीतील आपले 41 वे अर्धशतक झळकावले.

डीव्हिलियर्स टी-नटराजनच्या अचूक यॉर्करचा बळी ठरला. 43 बॉलमध्ये त्याने 56 धावा केल्या. हैदराबादकडून जेसन होल्डनने शानदार गोलंदाजी केली आणि 3 विकेट घेतल्या. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमवून 131 रन केले.