त्याला बॉलिंग करायला दिली आणि अचानक...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Updated: Dec 23, 2021, 11:59 AM IST
त्याला बॉलिंग करायला दिली आणि अचानक... title=

सिडनी : क्रिकेट खेळत असताना अनेकदा मजेशीर घटना घडतात. असचं नुकतंच बीग बॅश लीगमध्ये गंमतीशीर गोष्ट घडली आहे. या लीगमध्ये खेळणाऱ्या अॅडलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतले. कर्णधार पीटर सिडलने आपल्या गोलंदाजाला अगदी अनोख्या पद्धतीने किस करत सर्वांनाच चकित केलं.

कर्णधाराने केलं किस

बिग बॅश लीग (BBL) सध्या ऑस्ट्रेलियात खेळली जात आहे. अॅडलेड स्ट्रायकर्सचा विरूद्ध सिडनी सिक्सर्स यांच्यात सामना सुरु होता. लाइव्ह मॅचदरम्यान असं चित्र पाहायला मिळालं. लोक सोशल मीडियावर या घटनेचं जोरदार कौतुक करतायत.

प्रथम फलंदाजी करताना अॅडलेड स्ट्रायकर्स संघाने 147 रन्स केले. या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या सिडनी टीमची सुरुवात खूपच खराब झाली. अॅडलेडचा कर्णधार पीटर सिडलने पहिली ओव्हर गोलंदाज डॅनियल वॉरॉलकडे दिली. याचवेळी पीटरने डॅनियलच्या गालावर किस केलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

फॅन्सना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. एका यूजरने लिहिलंय की, कर्णधार आपल्या गोलंदाजाला मोटीवेट करण्यासाठी असं करतात. त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिलं की, हे वेगळ्या प्रकारचं प्रेम आहे.

प्रथम फलंदाजी करताना अॅडलेडच्या टीमने 147 रन्स केले होते. सिडनी टीमने 6 विकेट्स गमावून लक्ष्य गाठलं. अॅडलेड टीमकडून राशिद खानने 3 बळी घेतले. सिडनीसाठी सिल्कने शेवटच्या ओव्हरमध्ये झंझावाती खेळी करत 24 बॉलमध्ये 5 चौकारांच्या मदतीने 36 रन्स केले.