NZ vs NED : LIVE सामन्यात मिकेरेनने का जोडले हात? डॅरिल मिशेलला हसू आवरेना, पाहा Video

New Zealand vs Netherlands : पॉल व्हॅन मिकेरेनच्या (Paul van Meekeren) षटकात डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) फलंदाजी करत होता. मिकेरेनने बॉल बॅट्समनला फुलटॉस दिला.

Updated: Oct 9, 2023, 09:03 PM IST
NZ vs NED : LIVE सामन्यात मिकेरेनने का जोडले हात? डॅरिल मिशेलला हसू आवरेना, पाहा Video title=
NZ vs NED, Paul van Meekeren

Paul van Meekeren Viral Video : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वर्ल्ड कपचा (World Cup) 6 वा सामना खेळवली गेली. न्यूझीलंड आणि नेदरलँड (New Zealand vs Netherlands) यांच्यात कडवी झुंज पहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 322 धावा चोपल्या. न्यूझीलंडकडून विल यंगने 70 धावांची खेळी केली तर अखेरीस सँटनरने 17 बॉलमध्ये 36 धावा कुटल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 322 चा डोंगर उभारता आला आहे. अशातच आता या सामन्यात न्यूझीलंडच्या डावा दरम्यान एक धक्कादायक घटना पहायला मिळाली. 

क्रिकेट विश्वचषकात सलग दुसऱ्या सामन्यात कर्णधार केन विल्यमसनची उणीव असलेल्या न्यूझीलंडने नेदरलँड्सविरुद्ध दमदार सुरूवात केली. नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, न्यूझीलंडच्या फलंदाजांनी त्यांचा चांगलाच चोप दिला. विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) आणि टॉम लॅथम यांनी मजबूत धावसंख्या उभी केली. यावेळी डॅरिल मिशेल फलंदाजी करताना एक घटना घडली.

नेमकं काय झालं?

पॉल व्हॅन मिकेरेनच्या (Paul van Meekeren) षटकात डॅरिल मिशेल फलंदाजी करत होता. मिकेरेनने बॉल बॅट्समनला फुलटॉस दिला. त्यावेळी मिशेलने देखील संधी सोडली नाही. त्याने बॉलवर स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. त्याने एक शक्तिशाली सरळ ड्राइव्ह मारला पण स्टंप आडवे आले. नॉन-स्ट्रायकरच्या स्टंपवर बॉल आदळला. मात्र, त्याचवेळी बॉल मिकेरेन देखील थोडक्यात वाचला. त्यानंतर त्याने हात जोडून फलंदाजाचे आभार मानले. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या व्हायरल होत आहे.

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, विल यंग,​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट.

नेदरलँड: विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ'डॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, रायन क्लेन, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.