WATCH: "मी जखमी झालो नव्हतो, मला..." Shaheen Shah हे काय बोलला? तुफान व्हायरल होतोय Video!

Shaheen Shah Afridi Video Viral: शाहीन अफरीदी (Pakistan Pacer Shaheen Shah) आणि हारिस राऊफ (Haris Rauf) ही दोघं दुखापतग्रस्त असल्याने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टेस्ट सिरीजमध्ये (Pakistan vs England) संधी मिळाली नाही.

Updated: Dec 8, 2022, 07:27 PM IST
WATCH: "मी जखमी झालो नव्हतो, मला..." Shaheen Shah हे काय बोलला? तुफान व्हायरल होतोय Video! title=
Shaheen Shah Afridi

Shaheen Shah Afridi Pakistan vs England: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा धुव्वा उडवत वर्ल्ड कप उचचला. फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला होता. जिंकत आलेला सामना पाकिस्तानच्या हातून निसटला तो 16 व्या षटकात. त्याला कारण होतं, पाकिस्तानचा स्टार बॉलर शाहिन शाह अफ्रिदीला (Shaheen Afridi Injury) झालेली दुखापत. त्यानंतर शाहिनची सर्जरी देखील झाली होती. त्यानंतर आता शाहिनचा एक व्हिडीओ व्हायरल (Shaheen Shah Afridi Video Viral) होताना दिसतोय.

शाहीन अफरीदी (Pakistan Pacer Shaheen Shah) आणि हारिस राऊफ (Haris Rauf) ही दोघं दुखापतग्रस्त असल्याने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टेस्ट सिरीजमध्ये (Pakistan vs England) संधी मिळाली नाही. त्यामुळे अनेकांनी निराशा व्यक्त केली आहे. त्यानंतर आता शाहीनने मोठं वक्तव्य केलंय. आम्हाला दुखापत झाली नाही, आम्हाला नजर लागली, असं म्हणताच उपस्थित लोकं हसू लागली. असं काहीही नाही, आम्ही दोघं लवकरच मैदानात दिसणार आहोत ते देखील पूर्णपणे फीट होऊन, असंही शाहिन शाह म्हणाला आहे.

पाहा Video :

सध्या शाहिन अफ्रिदीचा हा व्हिडीओ सोशल (Social Media Viral Video) मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. एका पाकिस्तानी पत्रकाराने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर (Trending Video) केला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर शाहिन शहावर (Shaheen Shah Afridi) निशाणा साधला आहे. त्यामुळे आता शाहिन यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

आणखी वाचा - Shaheen Afridi ला झालंय काय? म्हणतोय "दुआ में याद रखना"

दरम्यान, हॅरी ब्रूकचा कॅच घेताना शाहिन अफ्रिदी (Shaheen Afridi) दुखापतग्रस्त झाला. त्याच्या गुडघ्याला जबर मार लागला होता. त्यामुळे त्याला ओव्हर देखील पुर्ण करता आली नाही. त्यानंतर बेबी ओव्हरमध्ये इंग्लंडने संधी साधली आणि सामना फिरवला होता. मात्र, शाहिन आफ्रिदीला पुन्हा ओव्हर टाकता आली नाही.