Olympics 2024 : यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक खेळांमध्ये भारतीय गटासाठी 6 ऑगस्ट 2024 हा दिवस अतिशय खास ठरला. (paris olympics 2024 vinesh phogat final match) विनेश फोगाटनं कुस्तीमध्ये धडाकेबाज कामगिरी करत अनेकांनाच सडेतोड उत्तर दिलं. तर, नीरज चोप्रानं भालाफेकमध्ये प्रभावी कामगिरी करत पदकाच्या आशा पल्लवित ठेवल्या. दिवसाचा शेवट मात्र काहीसा निराशाजनक झाला. कारण, भारतीय हॉकी संघानं उपांत्य फेरिमध्ये जर्मनीकडून मिळवलेला पराभव अनेकांच्याच जिव्हारी लागला.
एक संधी हुकलेली असतानाच 7 ऑगस्ट हा दिवस नव्या संधीसह उजाडला असून, आता भारतीय खेळाडू या दिवसाचं सोनं करतात का याकडेच क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक खेळांमध्ये आज (बुधवारी) खेळाडूंचा कमाल खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे.
विनेश फोगट, मीराबाई चानू, अंतिं पंघाल आणि या कुस्तीपटूंसमवेत अॅशलिट अविनाश साबळेकडेही पदकाची संधी असल्यामुळं आजच्या दिवशी भारताच्या खात्यात पदकाची भर पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे. विनेश फोगटनं कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारल्यामुळं तिच्यावर सर्वांच्या नजरा आहेत. पाहून घ्या आजच्या दिवसभरात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा आजचा दिवस कसा असेल, कुठे पाहता येतील या खेळाडूंचे सामने?
खेळ | क्रीडा प्रकार | खेळाडू | समय |
अॅथलेटिक्स | मॅरेथॉन रेस वॉक रिले मिक्स्ड | सूरज पवार, प्रियंका | सकाळी 11 वाजता |
गोल्फ | महिला एकेरी स्ट्रोक प्ले राऊंड 1 | अदिती अशोक, दीक्षा डागर | दुपारी 12.30 वाजता |
टेबल टेनिस | महिला संघ उप उपांत्य फेरी | भारत विरुद्ध जर्मनी | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं |
अॅथलेटिक्स | पुरूष उंच उडी पात्रता फेरी | सर्वेश अनिल | दुपारी 1 वाजून 35 मिनिटं |
अॅथलेटिक्स | महिला 100 मीटर हर्डल हीट | ज्योती यर्राजी | 1 वाजून 45 मिनिटं |
कुस्ती | महिला फ्री स्टाईल उप उपांत्य पूर्व फेरी | अंतिम पंघाल | 2 वाजून 30 मिनिटं |
अॅथलेटिक्स | पुरुष ट्रीप जंप पात्रता फेरी | अब्दुल्ला नारंगोलिनटेविडा, प्रवीण चित्रावेल | रात्री 10 वाजून 45 मिनिटं |
कुस्ती | महिला 50 किलो वजनी गट अंतिम फेरी | विनेश फोगट | रात्री 9 वाजून 45 मिनिटं |
वेटलिफ्टिंग | महिला 49 किलो वजनी गट | मीराबाई चानू | रात्री 11 वाजता |
अॅथलेटिक्स | पुरुष 3000 मीटर स्टेपलचेज | अविनाश साबळे | भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 01 वाजून 13 मिनिटं |
जागतिक स्तरावर - स्पोर्ट्स 18-3, स्पोर्ट्स 18-2, स्पोर्ट्स 18-1 एचडी
भारत फिड - स्पोर्ट्स 18-1, स्पोर्ट्स 18-2 एचडी
भारतात लाईव्ह स्ट्रीमिंग - जिओ सिनेमाच्या वेबसाईट आणि अॅपवर उपलब्ध