आयपीएल लिलाव: ८० कोटी खर्च करूनही या टीमला विकत घेता आला नाही कॅप्टन

दोन दिवस चाललेला आयपीएलचा लिलाव संपला आहे.

Updated: Jan 28, 2018, 07:43 PM IST
आयपीएल लिलाव: ८० कोटी खर्च करूनही या टीमला विकत घेता आला नाही कॅप्टन title=

बंगळुरू : दोन दिवस चाललेला आयपीएलचा लिलाव संपला आहे. आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यासाठी सगळ्या टीमनी त्यांच्या योजनेनुसार खेळाडू विकत घेतले. या सगळ्या लिलावानंतर अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री जुही चावला यांच्या मालकीच्या कोलकाता नाईटरायडर्स (केकेआर) बद्दल जोरदार चर्चा सुरु आहेत.

आयपीएलच्या लिलावामध्ये पोहोचलेल्या जुही चावलानं केकेआरसाठी ८० कोटी रुपये खर्च केले. आयपीएलमध्ये केकेआरनं १९ खेळाडू विकत घेतले पण या खेळाडूंमध्ये एकही कर्णधारपदाचा चेहरा नाही. त्यामुळे केकेआरचा कॅप्टन कोण होणार याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

हे आहेत कर्णधारपदाचे दावेदार

केकेआरच्या कर्णधारपदासाठी दिनेश कार्तिकचं नाव सगळ्यात आघाडीवर आहे. केकेआरनं दिनेश कार्तिकला ७.४ कोटी रुपये खर्च करुन विकत घेतलं. २००८ सालपासून कार्तिक वेगवेगळ्या टीमकडून आयपीएल खेळला. पण त्यानं कधीच लागोपाठ चांगलं प्रदर्शन केलं नाही.

आयपीएलमध्ये कार्तिकनं १५२ मॅच खेळल्या. यामध्ये २४च्या सरासरीनं त्यानं २९०३ रन्स बनवल्या. आयपीएलमध्ये कार्तिकचा स्ट्राईक रेट १२५ आहे. कार्तिकबरोबरच रॉबिन उथप्पाकडेही केकेआरचा कर्णधारपदाचा पर्याय म्हणून बघितलं जात आहे.

परदेशी खेळाडूंना कर्णधारपद सोपवण्याचा विचार केकेआरनं केला तर त्यांच्यापुढे आंद्रे रसेल, सुनिल नारायण, क्रिस लिन हे पर्याय आहेत. पण यापैकी कोणीही मोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये कर्णधारपद भुषवलं नाही.

केकेआरची पूर्ण टीम

आंद्रे रसेल- रिटेन खेळाडू

सुनिल नारायण- रिटेन खेळाडू

मिचेल स्टार्क- ९.४ कोटी रुपये

क्रिस लिन- ९.६ कोटी रुपये

दिनेश कार्तिक- ७.४ कोटी रुपये

रॉबिन उथप्पा- रिटेन खेळाडू

पियुष चावला- ४.२ कोटी रुपये

कुलदीप यादव- ४.८ कोटी रुपये

शुभमन गील- १.८ कोटी रुपये

ईशांक जग्गी- २० लाख रुपये

कमलेश नागरकोटी- ३.२ कोटी रुपये

नितीश राणा- ३.४ कोटी रुपये

विनय कुमार- एक कोटी रुपये

अपूर्व वानखेडे- २० लाख रुपये

रिंकू सिंग- ८० लाख रुपये

शिवम मावी- ३ कोटी रुपये

कॅमरून डेलपोर्ट- ३० लाख रुपये

मिचेल जॉनसन- २ कोटी रुपये

जैवन सियरल्स- ३० लाख रुपये

केकेआरच्या या टीमकडे पाहता यातल्या कोणत्याही खेळाडूला गौतम गंभीरची जागा भरुन काढणं कठीण दिसतंय. गौतम गंभीरच्या नेतृत्वात केकेआरनं दोन आयपीएल जिंकल्या होत्या. गौतम गंभीर आता त्याची होम टीम दिल्लीकडून खेळेल.