Pakistan Squad Against Afghanistan T20 Series: पाकिस्तानमधील क्रिकेटपटू सध्या तेथील सुपर लीग (पीएसएल 2023) खेळत आहेत. भारतामधील आयपीएलप्रमाणे ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाते. ही स्पर्धा संपल्यानंतर पाकिस्तानी संघ अफगाणिस्तानविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहेत. 3 सामन्यांसाठी पाकिस्तानच्या टी-20 संघाची घोषणा करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा संघ निवडताना बाबर आझमकडे (Babar Azam) कर्णधारपद (Pakistan Captain) देण्यात आलेलं नाही. बाबरऐवजी एका अष्टपैलू खेळाडूकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हणजेच पीसीबीने वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बाबार आझम, वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीसहीत (Shaheen Afridi) इतर काही खेळाडूंचा समावेश आहे. अफगाणिस्तानविरुद्ध 24 मार्चपासून शारजाहमध्ये सुरु होणाऱ्या 3 सामन्यांच्या मालिकेसाठी राष्ट्रीय निवड समितीने अष्टपैलू खेळाडू शादाब खानला (Shadab Khan) कर्णधार म्हणून निवडलं आहे. शादाब खानच्या नेतृत्वाखालील संघामध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून मोहम्मद रिझवान, हॅरिस रौफ आणि अनुभवी फलंदाज फखर जमां यांचाही समावेश करण्यात आलेला नाही.
पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजम सेठी यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देताना बाबर आझमच संघाचा कर्णधार असेल. संघामध्ये चार नव्या खेळाडूंना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. यामध्ये दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश असून त्यांची नावं इहसानुल्लाह (Ihsanullah) जमान खान (Zaman Khan) अशी आहेत. तर 2 नव्या फलंदाजांनाही पहिल्यांदाच पाकिस्तानी संघात संधी देण्यात आली आहे. तैय्यब ताहिर (Tayyab Tahir) आणि सईम अयूब (Tayyab Tahir) अशी या नव्या खेळाडूंची नावं आहेत.
नव्या खेळाडूंबरोबरच आजम खान (Azam Khan), फहीम अशरफ (Faheem Ashraf) आणि इमाद वसीम (Imad Wasim) या 3 खेळाडूंनी संघात पुनरागमन केलं आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यानच्या 3 सामन्यांच्या मालिकेमधील पहिला टी-20 सामना 25 मार्च रोजी, दुसरा 27 मार्च आणि शेवटचा सामना 29 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. तिन्ही सामने शारजहाच्या मैदानात खेळवले जाणार आहेत.
शादाब खान (कप्तान), अब्दुल्ला शफीक, आजम खान, फहीम अशरफ, मुहम्मद नवाज, मुहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, सईम अयूब, इफ्तिखार अहमद, इहसानुल्लाह, इमाद वसीम, मुहम्मद हारिस, शान मसूद, तैय्यब ताहिर, जमान खान.
Pakistan squad for T20I series against Afghanistan in Sharjah #AFGvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/gzObBOQ25K
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 13, 2023
ओसामा मीर अबरार अहमद आणि हसीबुल्लाह खान.