वनडे क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम, एकही सिक्स न लगावता ३४५ रन

वनडे क्रिकेटमध्ये नव्या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे.

Updated: Feb 27, 2020, 09:10 PM IST
वनडे क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम, एकही सिक्स न लगावता ३४५ रन title=

हमबनटोटा : वनडे क्रिकेटमध्ये नव्या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये श्रीलंकेने ५० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून ३४५ रन केले. एवढा मोठा स्कोअर करुनही श्रीलंकेने त्यांच्या इनिंगमध्ये एकही सिक्स लगावली नाही. याआधी हा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता. इंग्लंडने २०११ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६ विकेट गमावून ३३३ रन केले होते.

श्रीलंकेकडून आविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस यांनी शानदार शतकं केली. फर्नांडोने १२७ रन आणि मेंडिसने ११७ रनची खेळी केली, त्यामुळे श्रीलंकेने वेस्ट इंडिजवर १६१ रननी विजय मिळवला. वेस्ट इंडिजची पूर्ण टीम ३९.१ ओव्हरमध्ये १८४ रनवर ऑलआऊट झाली. विकेट कीपर शाय होपने अर्धशतकीय खेळी करुन वेस्ट इंडिजची लाज राखली.

श्रीलंकेला या मॅचमध्ये सिक्स लगावता आली नसली तरी वेस्ट इंडिजच्या फॅबियन एलनने एक सिक्स मारला. फर्नांडोने त्याच्या १२७ रनच्या खेळीत १० सिक्स लगावले, तर कुशल मेंडिसने ११७ रनमध्ये १२ फोर मारले.