Neeraj Chopra in Javelin Throw Final : संपूर्ण भारताला ज्याची प्रतिक्षा होती त्या सामन्याचा निकाल लागला आहे. भालाफेक स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने रौप्यपदकाला गवसणी घातली. नीरजने 89.45 मीटर भाला फेकून इतिहास रचला. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटरचा थ्रो केला आणि गोल्ड मेडल पटकावलं. नीरज भारताचा दुसरा पुरूष खेळला आहे, ज्याने दोन ऑलिम्पिक पदक पटकावली आहे. सुशील कुमारने देखील याआधी दोन ऑलिम्पिक पदक जिंकली होती.
नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल गेला. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटरचा थ्रो केला आणि ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडला. नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात 89.45 चा थ्रो केला. नीरजचा तिसरा थ्रो देखील फाऊल गेला. तिसऱ्या राऊंडनंतर 12 पैकी 8 खेळाडू पुढील राऊंडसाठी कायम राहिले. पहिल्या तीन राऊंडनंतर नीरज दुसऱ्या क्रमांकावर होता.
नीरज चोप्राचा चौथा थ्रो देखील फाऊल गेला. नीरजच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. नीरज चोप्राचा पाचवा थ्रो देखील फाऊल गेला अन् भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न फिक्कं दिसू लागलं. नीरजकडे आणखी एक संधी होती. त्यामुळे नीरजने पूर्ण फोकस केला. नीरजने पाचव्या राऊंडपर्यंत दुसऱ्या स्थानी कायम होता. नीरजचा सहावा थ्रो देखील खास ठरला नाही. अशाप्रकारे नीरज चोप्राने भारतीयांना नाराज न करता आणखी एक पदक मिळवून दिलं आहे.
THE 89.45M THROW OF NEERAJ CHOPRA. pic.twitter.com/Zi4V1dxkzy
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 8, 2024
पात्रता फेरीत नीरज चोप्राने 89.34 मीटर थ्रो केला. या दमदार कामगिरीच्या जोरावर नीरजने थेट अंतिम फेरीत धडक मारली. या हंगामातला नीरजचा हा दुसरा बेस्ट थ्रो होता. नीरजने क्वालिफाय सामन्यात स्वत:चा रेकॉर्ड मोडला होता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने 87.58 मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक पटकावलं होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जुलै 2024 च्या आकडेवारीनुसार नीरज चोप्राकडे एकूण 37.6 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. नीरज चोप्राचे वार्षिक पॅकेज 4 कोटी रुपय आहे. तर इतर मालमत्तेत एंडोर्समेंट डील आणि त्याने मिळवलेल्या रोख पुरस्कारांचाही समावेश आहे. नीरज चोप्राकडे लक्झरी गाड्याचं कलेक्शन आहे.
जागतिक अॅथलेटिक्सच्या नियमानुसार पुरुष भालाफेक प्रकारात भाल्याचं वजन 800 इतकं असतं. तर भाल्याची लांबी 2.6 ते 2.7 मीटर पर्यंत असावी लागते. तर महिला भालाफेक प्रकारात भाल्याचं वजन 600 ग्राम इतकं असतं. तर भाल्याची लांबी 2.2 ते 2.3 मीटरपर्यंत असण्याचा नियम असतो.