Neeraj Chopra : मधुर भंडारकरकडून फिल्मची ऑफर, काय आहे नीरजचं उत्तर?

नीरज चोप्राला सिनेमांची ऑफर 

Updated: Aug 19, 2021, 09:36 AM IST
Neeraj Chopra : मधुर भंडारकरकडून फिल्मची ऑफर, काय आहे नीरजचं उत्तर? title=

मुंबई : टोक्यो ऑल्मपिकमध्ये देशाची छाती अभिमानाने फुलली ती नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू यांच्या कामगिरीमुळे. नीरजने गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला आहे. अशावेळी फिल्ममेकर मधुर भंडारकर (Madhur Bhandarkar) नीरज चोप्रा आणि मीराबाई चानूला भेटले. यानंतर दोघांच्या बायोपिकवर जोरदार चर्चा रंगली. 

मधुर भंडारकर स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीत होते. ते म्हणाले की,' मला टोक्यो ऑल्मपिक खेळाडूंच्या यशाचं कौतुक करायचं होतं. भारताला अभिमान वाटत असलेल्या या खेळाडूंच मला कौतुक करायचं होतं'. 

मधुर भंडारकर यांचा खुलासा 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

मधुर भंडारकर यांचं म्हणणं आहे की,'मी नीरजला सांगितलं की, तू सुपरस्टार बनला आहेस. आता जगभरात नीरजचे चाहते आहेत.' यानंतर मस्करीत मधुर म्हणाले की,'तू दिसायला खूप गुड लूकिंग आहेस. तर कधी अभिनय करण्याचा विचार केलास?' या प्रश्नावर नीरजने दिलेलं उत्तर महत्वाचं आहे 

नीरजने मधुर भंडारकर यांना दिलेलं उत्तर 

यावर नीरजने मधुर भंडारकर यांना उत्तर दिलं की, मला अभिनय नाही करायचा. मला फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करायचं आहे. नीरजकडे भविष्याचा सुंदर असा रोडमॅप तयार आहे. नीरजला देशाकरता आणखी बरंच काही मिळवायचं आहे. त्यामुळे हे खेळाडू आपल्या खेळात अधिक फोकस आहेत. त्यांच संपूर्ण लक्ष हे आपल्या खेळाकडे आणि देशाचं नाव आणखी उंच करण्याकडे आहे. 

नीरज चोप्राची बिघडली होती तब्बेत 

 भारताचा गोल्डन बॉय, ऑल्मपिकमध्ये सुवर्णपद जिंकणारा नीरज चोप्रा याची अचानक तब्बेत बिघडली आहे. नीरज चोप्रा सुवर्ण पदक जिंकल्यानंतर दहा दिवसांनी मंगळवारी पानीपतमध्ये पोहोचला. समालखाच्या हल्दाना बॉर्डरवर असलेल्या त्याच्या गावी खंडरा येथे पोहोचला. खंडरा येथील स्वागत कार्यक्रमात नीरजला स्टेजच्या मागून आणण्यात आलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, अचानक तब्बेत बिघडल्यामुळे त्याला रूग्णालयात नेण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून नीरजला 3 दिवसांपासून ताप होता. मात्र त्याची कोविड चाचणी निगेटिव्ह आली. मात्र त्याला अस्वस्थ वाटत होते. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी भरपूर गर्दी असल्यामुळे कार्यक्रमही लवकर संपवण्यात आलं.