ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑफ स्पिन बॉलर नाथन लायन हा पत्नी आणि दोन मुलांना फसवण्याच्या प्रकरणाने चर्चेत आला आहे.
मेल ऑनलाईनच्या वृत्तानुसार लायन एक वर्षाहून अधिक काळ एका मॉडेलला डेट करतोय. जेव्हा त्याच्या पत्नीला हे कळाल तेव्हा ती खूपच निराश झाली.
३० वर्षाच्या लायनचा एक फोटो समोर आलाय, ज्यामध्ये तो आपली गर्लफ्रेंड मॅकार्थीला कारमध्ये किस करत आहे.
हा फोटो ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पर्थमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्ट दरम्यानचा आहे. हा फोटो सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
लायन आणि त्याची पत्नी मेलिसा वारिंग हे १० वर्ष एकत्र होते. पण तो मॅकार्थीच्या खूप जवळ आला आहे.
वारिंगच्या मित्राने सांगितले की, वारिंग खूप निराश झालीए, फोनवरही बोलत नव्हती.
मी दोन मुलांची देखभाल करत आहे मग माझ्यासोबतच एवढ वाईट दिवस का आले ? असा प्रश्न नाथन लायनची पत्नी विचारत आहे.
पण त्या क्रिकेटरच्या वडिलांना अजून वाटते की त्यांचा मुलगा त्याचे आयुष्य वारिंगसोबत मजेत जगतोय.