कोलंबो : टीम इंडियाचा विकेट कीपर महेंद्रसिंग धोनीनं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड बनवलं आहे. वनडे क्रिकेटमध्ये स्टम्पिंग घेण्याऱ्या विकेट कीपरच्या यादीमध्ये धोनीनं संगकाराची बरोबरी केली आहे.
दुसऱ्या वनडेमध्ये धोनीनं गुणतिलकेला स्टम्पिंग केलं. गुणतिलकेचा हा स्टम्पिंग धोनीच्या वनडे करिअरमधला ९९वा स्टम्पिंग होता. संगकारानं त्याच्या वनडे करिअरमधल्या ४०४ मॅचमध्ये ९९ स्टम्पिंग केले आहेत. तर हेच रेकॉर्ड करायला धोनीला फक्त २९८ मॅच लागल्या आहेत. त्यामुळे स्टम्पिंगची सेंच्युरी पूर्ण करण्यासाठी धोनीला आता फक्त एकाच शिकारीची गरज आहे.
— Virat Kohli (@Cricvids1) August 24, 2017