Mohammed Shami: 'घर'च्या मैदानावर शमी क्लिन बोल्ड; 5 वर्षांनंतर कोर्टाने दिला 'हा' मोठा निर्णय!

Hasin Jahan: शमीची पत्नी हसीन जहाँ हसीनने (Mohammed Shami Wife) 2018 साली दरमहा 10 लाख रुपये पोटगी (alimony) म्हणून मिळावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

Updated: Jan 24, 2023, 12:20 AM IST
Mohammed Shami: 'घर'च्या मैदानावर शमी क्लिन बोल्ड; 5 वर्षांनंतर कोर्टाने दिला 'हा' मोठा निर्णय! title=
mohammed shami, hasin jahan

Mohammed Shami, Hasin Jahan: गेल्या काही वर्षांपासून मोहम्मद शमी याच्या (Mohammed Shami) वैयक्तिक आयुष्यात सर्व काही सुरळीत चालतंय असं दिसत नाहीये. पत्नी हसीन जहाँने (Hasin Jahan) शमीवर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा (Domestic Violence) दाखल केला होता. प्रकरण न्यायालयात (Court) गेल्याने शमी आणि त्याच्या खेळावर लक्ष्य देत नव्हता. आता कुठे तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर धुमाकूळ घालत असल्याचं दिसत असताना 'घर'च्या मैदानावर शमी क्लिन बोल्ड झाल्याचं दिसतंय. (mohammed shami ordered to pay monthly alimony to estranged wife hasin jahan by court sports marathi news)

कोलकाताच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने (Fast Track Court) सोमवारी शमीला त्याच्या विभक्त राहणाऱ्या पत्नीला दरमहा 1 लाख 30 हजार रुपये खर्चासाठी देण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे शमीला आणखी एक धक्का बसलाय. मुलीच्या देखभालीसाठी 80 हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात आलेत तर 50 हजार रुपये हे वैयक्तिक खर्चासाठी असणार आहेत.

शमीची पत्नी हसीन जहाँ हसीनने (Hasin Jahan) 2018 साली दरमहा 10 लाख रुपये पोटगी (alimony) म्हणून मिळावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. आयकर रिर्टननुसार, वार्षिक उत्पन्नाच्या आधारावरून ही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर शमीच्या वकिलांनी खिंड लढवत जोरदार बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकून घेऊन कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिलाय.

आणखी वाचा - IND vs NZ 3rd ODI: सिरीज गमावली तरीही किवींना 'नो टेन्शन', डेरिल मिशेलचं धक्कादायक विधान, म्हणतो...

दरम्यान, हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami, Hasin Jahan) यांचा विवाह 2014 साली झाला होता. दोघांनाही एक मुलगी आहे, पण हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. 2018 मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमीवर घरगुती हिंसाचार, मारहाण, हुंडाबळी आणि क्रिकेट फिक्सिंगसारखे अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतरच्या बीसीसीआयच्या (BCCI) चौकशीत तो निर्दोश देखील सिद्ध झाला होता.