पांड्याला इंग्लडच्या या खेळाडूने टाकले मागे, ठोकले ४ षटकार

इंग्लंडचा ऑलराऊंडर खेळाडू मोइन अलीने ब्रिस्टलच्या मैदानावार रविवारी जबरदस्त खेळी केली. वेस्ट इंडीजविरूद्ध झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये ५३ चेंडूंमध्ये ८ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने शानदार शतक ठोकले.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 25, 2017, 05:32 PM IST
पांड्याला इंग्लडच्या या खेळाडूने टाकले मागे, ठोकले ४ षटकार title=

नवी दिल्ली : इंग्लंडचा ऑलराऊंडर खेळाडू मोइन अलीने ब्रिस्टलच्या मैदानावर रविवारी जबरदस्त खेळी केली. वेस्ट इंडीजविरूद्ध झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये ५३ चेंडूंमध्ये ८ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने शानदार शतक ठोकले.

या सामन्यात मोईन अलीने याने एका षटकात लागोपाठ ४ षटकार लगावले. नुकतेच भारताच्या हार्दिक पांडयाने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या सामन्यात अॅडम झम्पा याला एका षटकात लागोपाठ तीन षटकार लगावले होते. त्यामुळे मोईने पांड्याला या बाबतीत मागे टाकले.

या सामन्यात मोइनने ५७ चेंडूंमध्ये १०२ धावा बनवल्या. शेवटच्या ८ चेंडूंमध्ये मोइनने ४२ धावा केल्या. या ८ चेंडूंमध्ये मोइनने ६-६-२-४-६-६-६-६ च्या फरकाने धावा केल्या. विशेष असे की, मोइनने ५० धावा केवळ १२ चेंडूमध्ये ठोकल्या. मोइनचा हा अनोखा अंदाज पाहून आक्रमक गोलंदाजी करणारी वेस्ट इंडिजचा संघ अचानक दबावाखाली आला. या सामन्यात इंग्लंडने या सामन्यात वेस्ट इंडिजला १२४ धावांनी धूळ चारली.

 

 

दरम्यान, मोइनचे हे शतक इंग्लंडचा खेळाडू जोस बटलरच्या नंतरचे सर्वाधीक वेगाने ठोकले गेलेले दुसरे शतक आहे. बटलरने दुबईमध्ये नोव्हेंबर २००५ मध्ये पाकिस्तानविरूद्ध ४६ चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. जो रूटने ७९ चेंडूत ८४ (७ चौकार, २ षटकार) धावा ठोकल्या होत्या. बेन स्टोक्सने ६३ चेंडूंमध्ये ७३ धावांची शानदार खेळी केली. यात ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.