फायनलमध्ये रनआऊट का झाली याचा मोठा खुलासा केला मिथाली राजने

 आयसीसी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने भारताला पराभूत केले. या सामन्यात कर्णधार मिथाली राज ही रन आऊट झाली. त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. एखाद्या नव्या खेळाडूप्रमाणे आपली विकेट फेकल्याचे बोलले जात आहे. पण आता मिथालीने आपल्या रन आऊट होण्याबद्दल खुलासा केला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 25, 2017, 04:50 PM IST
फायनलमध्ये रनआऊट का झाली याचा मोठा खुलासा केला मिथाली राजने  title=

नवी दिल्ली :  आयसीसी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने भारताला पराभूत केले. या सामन्यात कर्णधार मिथाली राज ही रन आऊट झाली. त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. एखाद्या नव्या खेळाडूप्रमाणे आपली विकेट फेकल्याचे बोलले जात आहे. पण आता मिथालीने आपल्या रन आऊट होण्याबद्दल खुलासा केला आहे. 

 

मिथाली राज मॅचच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर रन आऊट झाली, त्यावर जे काही तर्क लढविले जात आहे ते काही योग्य नाही, असे मिथालीने सांगितले आहे. आऊट होण्याचे कारण वेगळे आहे. मिथाली म्हणाली, की रन घेण्यासाठी पळथ असताना तिच्या शूजचे स्पाईक जमिनीत धसून गेले. त्यामुळे तिला पळता आले नाही. 

मिथालीने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, मी सोशल मीडियावर पाहिले की मी रन आऊट झाले त्यानंतर अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. पण मी सांगू इच्छिते की रन घेताना माझे स्पाईक जमिनीत रुतले. पूनमने मला रनसाठी बोलवले आणि त्यावेळी रन घेत असताना अर्ध्यावर असताना माझ्या शूजचे स्पाईक पीचमध्ये अटकले. मला नाही वाटत की हे टीव्ही कॅमेऱ्यात दाखविण्यात आले. त्यामुळे मी जोरात धावू शकली नाही. तसेच डाइव्ह मारू शकली नाही.