मिचेल स्टार्कच्या भावानं रचला इतिहास, क्रिकेट नाही तर...

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कच्या कुटुंबाचं क्रिकेटवर प्रेम आहे.

Updated: Apr 12, 2018, 06:06 PM IST
मिचेल स्टार्कच्या भावानं रचला इतिहास, क्रिकेट नाही तर...  title=

गोल्ड कोस्ट : ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कच्या कुटुंबाचं क्रिकेटवर प्रेम आहे. स्टार्कची पत्नी एलीसा ऑस्ट्रेलियाची विकेट कीपर बॅट्समन आहे. पण मिचेल स्टार्कच्या भावानं मात्र दुसऱ्या खेळामध्ये इतिहास घडवला आहे. राष्ट्रकूल स्पर्धेमध्ये ब्रेंडन स्टार्कनं २.३२ मीटरची उडी मारून रेकॉर्ड बनवला आहे. या प्रदर्शनामुळे स्टार्कला सुवर्ण पदक मिळालं आहे. याआधी ब्रेंडन स्टार्कला २०१० युवा ऑलिम्पिकमध्ये रजत पदक मिळालं होतं.

क्रिकेट खेळत नाही ब्रेंडन स्टार्क

मी क्रिकेट खेळत नाही. तो माझ्या भावाचा खेळ आहे. लहान असताना घरामध्ये क्रिकेट खेळायचो पण मला हा खेळ आवडत नाही, असं ब्रेंडन म्हणाला आहे. मिचेल स्टार्क सध्या पायाला दुखापत झाल्यामुळे क्रिकेट खेळत नाहीये. तर मिचेलची बायको एलीसा भारत दौऱ्यावर होती. या दौऱ्यातल्या एका मॅचमध्ये तिनं भारताविरुद्ध शतकही झळकावलं होतं.