Sachin Tendulkar : 'बाबा तुमची आठवण येते..', वडिलांच्या आठवणीत क्रिकेटचा देव भावूक, म्हणतो...

Ramesh Tendulkar 25th death anniversary : क्रिकेटचा देव सचिन (Sachin Tendulkar) जेव्हा वडील रमेश तेंडूलकर यांच्या आठवणीत भावूक होतो, तेव्हा...

सौरभ तळेकर | Updated: May 26, 2024, 06:11 PM IST
Sachin Tendulkar : 'बाबा तुमची आठवण येते..', वडिलांच्या आठवणीत क्रिकेटचा देव भावूक, म्हणतो... title=
Sachin Ramesh Tendulkar, 25th death anniversary

Sachin Ramesh Tendulkar : सचिन तेंडूलकर क्रिकेटर (Sachin Tendulkar) म्हणून महान आहेच पण माणूस म्हणून देखील सचिनने नाव कमवलंय. सचिनच्या व्यक्तीमहत्त्वाची ओळख करून देणारी अनेक प्रसंग तुम्ही ऐकली असतील. सचिनला त्याच्या आयुष्याची मुल्य दिली ती त्याच्या वडिलांनी म्हणजेच रमेश तेंडूलकर (Ramesh Tendulkar) यांनी... अशातच आता सचिन तेंडुलकरने 25 व्या पुण्यतिथीनिमित्त (Ramesh Tendulkar 25th death anniversary) त्यांचं स्मरण केलं आणि त्यांच्या शिकवणींना उजाळा दिला. सोशल मीडियावर पोस्ट करत सचिन बाबांच्या आठवणीत भावूक झाल्याचं दिसून आलं. 

काय म्हणाला सचिन तेंडूलकर?

बाबा सोडून गेले त्याला आता 25 वर्षे झाली, पण आजही त्यांच्या जुन्या खुर्चीवर उभे राहिल्यासारखं वाटतं की, ते अजूनही माझ्यासोबत आहेत. मी त्यावेळी फक्त 26 वर्षांचा होतो आणि आता, 51 व्या वर्षी, त्यांनी माझ्या आयुष्यावर आणि इतर अनेकांच्या जीवनावर किती प्रभाव पाडला हे मला अधिक स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्या 25 व्या पुण्यतिथीला 43 वर्षांनंतर या ठिकाणाला भेट देणं अत्यंत भावनिक क्षण आहे. त्यांचे शहाणपण आणि दयाळूपणा मला सतत प्रेरणा देत आहे. बाबा, मला दररोज तुमची आठवण येते आणि मला आशा आहे की तुम्ही माझ्यामध्ये जी मूल्ये रुजवलीत त्यानुसार मी जगत आहे, असं सचिन पोस्ट करत म्हणाला आहे.

रमेश तेंडुलकर यांच्या 25 व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी मराठी संशोधन पत्रिकेच्या विशेषांकाचे सचिन तेंडुलकरच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं होतं. तसेच नितीन तेंडुलकर यांच्या ‘उडता उडता’ आणि ‘अधिक उंच उडता उडता’ या दोन पुस्तकांचेही प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलत असताना सचिन तेंडूलकरने वडिलांच्या आठवणी सांगितल्या.

दरम्यान, मी जेव्हा प्रॅक्टिस करून खूप थकायचो तेव्हा घरी आल्यावर मी झोपून जायचो. पण आई आणि बाबा मला नेहमी शिवाजी पार्कला भेटायला येयचे, अशी आठवण सचिनने यावेळी सांगितली.